मुंबई,: टाटा समूहाची प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटलने देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे – ‘सवाल करो, फिर लोन लो’. भारतातील कर्ज सुविधांची वाढती पोहोच लक्षात घेता, कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी त्याबद्दल योग्य प्रश्न विचारणे आणि पूर्ण माहितीनिशी, जागरूकतेने निर्णय घेण्यासाठी ग्राहकांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आजच्या काळात कर्ज हा आपल्या जीवनशैलीचा, सुखाचा आणि स्वप्नांचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तंत्रज्ञानामुळे कर्ज मिळणे इतके सोपे झाले आहे की, आता कोणत्याही कागदपत्रांच्या कटकटीशिवाय त्वरित पैसे मिळतात. परंतु, अशा काळात टाटा कॅपिटल तुम्हाला एक छोटीशी विनंती करत आहे: थांबा, योग्य प्रश्न विचारा आणि आपली जबाबदारी नीट समजून घ्या. कारण एक समजूतदार निर्णयच तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतो.
लॉन्च प्रसंगी टाटा कॅपिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ राजीव सभरवाल म्हणाले, “भारताच्या प्रगतीमध्ये इथल्या लोकांची मोठी स्वप्ने आणि कर्जाची सुलभ उपलब्धता यांची भूमिका मोलाची आहे. टाटा कॅपिटलमध्ये आम्ही पारदर्शकता आणि जबाबदारीचे पालन यांना सर्वाधिक प्राधान्य देतो. ‘सवाल करो, फिर लोन लो‘ या मोहिमेद्वारे आम्हाला प्रत्येक भारतीयाला जागरूक व सक्षम करायचे आहे, जेणेकरून त्यांनी कर्ज घेण्यापूर्वी योग्य प्रश्न विचारावेत आणि आपल्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घ्यावी. देशातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि सुरक्षित व्हावा आणि देशात एक जबाबदार ‘क्रेडिट इकोसिस्टम‘ विकसित होत राहावी, हेच आमचे ध्येय आहे.”
ही मोहीम डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, मायक्रोसाइट्स, ब्लॉग्स आणि लघुपटांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचेल. सोप्या भाषेतील माहिती आणि रंजक कन्टेन्टच्या आधारे जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाणे आणि त्यांना जागरूक करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.

