महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये रविवारी (दि.१५) रात्री ११.१० वाजेच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला आहे. परिणामी या अतिउच्चदाब रोहित्रावर अवलंबून असलेला ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला असून भोसरी व पिंपरी विभागातील वीज ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे महावितरणने या भागातील वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
बाधित भागाची नावे-
• एस ब्लॉक
• जे ब्लॉक
• डी २ ब्लॉक
• एफ २ ब्लॉक
• टी ब्लॉक
• इंद्रायणीनगर
• भोसरीगाव
• जलवायू विहार
• गंधर्व नगरी
• सेक्टर ६,४
• नेहरू नगर
• संत तुकाराम नगर
• दापोडी
• कासारवाडी
पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
दि. ०२ फेब्रुवारी,२०२६ महापारेषण कंपनीच्या याच २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्र अंतर्गत बिघाड झाला होता. त्यावेळी देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते.
सद्यस्थितीत देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरुच आहेत. दिवसभरात इतर वीजवाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. परंतु, अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यावरही महावितरणकडून त्वरित उपाय योजना करण्यात येईल.
वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
अचानक उद्भवलेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनीही महावितरणला सहकार्य करावे, विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

