रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सव दि. २० फेब्रुवारीपासून

Date:

धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार

पुणे : ब्रह्मनाद कला मंडळ व धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी (२५वा) ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे शुक्रवार, दि. २० ते रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धायरी येथे आयोजन करण्यात आले आहे. गायन, वादन आणि नृत्याचा संगम साधणाऱ्या संगीत महोत्सवात युवा आणि प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.

संगीत महोत्सवात दिल्या जाणाऱ्या ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने ज्येष्ठ गायक, संगीततज्ज्ञ पंडित सत्यशील देशपांडे यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध गायक डॉ. पंडित संजय गरुड यांनी आज (दि. १४) पत्रकार परिदेत दिली. ब्रह्मनाद कला मंडळाच्या सचिव रागिणी गरुड, विश्वस्त सुभाष चाफळकर, सल्लागार आसावरी आंबेकर, धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक अनिकेत चव्हाण उपस्थित होते.

महोत्सवाविषयी माहिती देताना डॉ. पंडित संजय गरुड म्हणाले, ‘सोन्याची पायरी’ अशी ओळख असलेल्या धायरी उपनगरात शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार व्हावा, अशी अपेक्षा किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक व गुरू पंडित श्रीकांत देशपांडे यांची होती. त्यांच्या इच्छेनुसार ब्रह्मनाद संगीत महोत्सवाला सुरुवात केली. गेल्या २४ वर्षांपासून अव्याहतपणे महोत्सव सुरू आहे. महोत्सवाला दरवर्षी रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

यंदाचा महोत्सव सायंकाळी ५:३० ते रात्री १० या कालावधीत सिंहगड रोडवरील धायरीतील धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात येत आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

शुक्रवार, दि. २० : सहभागी कलाकार :

सरगम गरुड (कथक), मधुश्री नारायण (गायन), पंडित शैलेश भागवत (शहनाई वादन), पंडित राजेंद्र कंदलगावकर (गायन).

शनिवार, दि. २१ : सहभागी कलाकार : विराज जोशी (गायन), रोसी दत्ता (गायन), डॉ. बिपुलकुमार राय (संतूर वादन), पंडिता शुभदा पराडकर (गायन).

रविवार, दि. २२ : सहभागी कलाकार : आर्या नंदे (ओडिसी नृत्य), अनुपम जोशी (सरोद वादन), डॉ. पंडित संयज गरुड (गायन).

कलाकारांना पंडित अरविंदकुमार आझाद, पंडित पांडुरंग मुखडे, अरुप सेनगुप्ता, पंडित अतुल ताडे, राजगोपाल गोसावी, महेश साळुंखे, रोहन पंढरपूरकर, ऋषिकेश जगताप, सुधीर काळे, भरत चव्हाण, (तबला), माऊली फाटक (पखवाज), उपेंद्र सहस्रबुद्धे, संतोष अत्रे, अविनाश दिघे, उदय कुलकर्णी, तुषार केळकर, निषाद गरुड, महेश गोसावी (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कौशल्य विकासाचे नवीन युग: मंत्री  चंद्रकांतदादा पाटील

फ्युएल-एनएसई बेल रिंगिंग सोहळ्यात 'कमवा आणि शिका' मुलींसाठी विद्यावेतन...

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली- कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन...

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि...

वापरून झालेल्या बॅटरी साहित्याचा पुनर्वापर करण्यात शास्त्रज्ञांना यश

नवी दिल्‍ली- वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या...