इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीच्या भुपेश अशोक दिक्षीतवर गुन्हा दाखल

Date:

पुणे- कोरेगाव पार्क येथील इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीचा मालक भुपेश अशोक दिक्षीत वय ४२ वर्षे, याचेविरुध्द आर्थिक गुन्हे शाखा, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरमहा ४ ते १० टक्के व्याजाने ठेवी घेऊन फसवणूक करणे असा त्याच्यावर आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरातील महिला फिर्यादी व इतर लोकांना इन्फिस्को शेअर मार्केट कंपनी मध्ये पैसे गुंतविल्यास सदरचे रक्कमेवर महिन्यास ४ टक्के, ७ टक्के, १० टक्के दराने नफा देण्याचे आमिष दाखवुन त्यांना कोट्यावधी रुपये गुंतवणुक करायला भाग पाडले व सुरुवातीला गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही महिने नफा देऊन नंतर मुळ रक्कम, तसेच परतावा न देता, नफा ही न देता अन्यायाने फिर्यादी यांची व इतर गुंतवणुकदारांचीही कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी सदर तक्रारीचे अनुषंगाने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं-९६/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१६(२), ३१६ (५),३१८ (४), व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल् करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतर्फे सहा. पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख या करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार गुप्ता, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे)पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ,सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, सौ शुभदा संखे (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख (तपासी अधिकारी) या प्रकरणी तपास करीत आहेत..
या इन्फिस्को शेअर मार्केट कंपनी या भुपेश अशोक दिक्षीत यांचेकडुन परतावा देण्याचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक झाली असल्यास संबंधीत कागदपत्रे व पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर या ठिकाणी तपासकामी हजर राहावे असे आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सव दि. २० फेब्रुवारीपासून

धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार पुणे...

शहरी सहकारी बँकांची कर्जपुरवठ्यातील भूमिका विस्तारली; पाच वर्षांत थकबाकी जवळपास दुप्पट

● 8 प्रमुख कर्जउत्पादनांमध्ये एकूण कर्जवाटपापैकी 83% हिस्सा केंद्रित असून, त्यात व्यावसायिक कर्जांचा सर्वाधिक 30% वाटा...

मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेची जबाबदारी तथाकथीत विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी..वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन...

मेट्रोचा स्लॅब रोडवर कोसळला:ऑटो, कारचा चेंदामेंदा; 1 जण ठार, 3 जण जखमी

मुंबई-मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3...