मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेची जबाबदारी तथाकथीत विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी: हर्षवर्धन सपकाळ

Date:

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी..
वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात सुरु असून तो आता लोकांच्या जिवावर उठला आहे हे मुलुंडच्या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. मेट्रोची कामं लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? कामाचा दर्जा आणि सुरक्षेकडे सरकार बघणार आहे की नाही? हा प्रश्न असून फक्त कंत्राटदारावर कारवाई करुन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये. जसे श्रेय घेता तशी जबाबदारीही घेण्यास भाजपा महायुती सरकारने शिकले पाहिजे. असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

कोस्टल रोड, मुंबई ट्रांस हार्बर लिंक रोड, समृद्धी महामार्ग या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे बांधकाम किती तकलादू आहेत हे एका वर्षातच या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लाखो कोटी रुपये खर्च करून जर हे प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील तर असा विकास काय कामाचा? मुलुंडमध्ये मेट्रो कामाचे स्लॅब कोसळण्याच्या घटनेची सरकारने गांभिर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहरी सहकारी बँकांची कर्जपुरवठ्यातील भूमिका विस्तारली; पाच वर्षांत थकबाकी जवळपास दुप्पट

● 8 प्रमुख कर्जउत्पादनांमध्ये एकूण कर्जवाटपापैकी 83% हिस्सा केंद्रित असून, त्यात व्यावसायिक कर्जांचा सर्वाधिक 30% वाटा...

मेट्रोचा स्लॅब रोडवर कोसळला:ऑटो, कारचा चेंदामेंदा; 1 जण ठार, 3 जण जखमी

मुंबई-मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3...

नगरसचिव योगिता भोसलेंच्या हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल १२५ महिलांना मोफत शिलाई मशिन

महिला स्वबळावर उभ्या राहिल्या तर कुटुंबाचे सक्षमीकरण -सावित्रीबाई फुले...

बालाजीनगरच्या “श्री साई लॉजिंग”वर छापा..

वेश्याव्यवसायातुन ०१ अल्पवयीन मुलीची सुटका, ०१ महिला आरोपी व...