वेश्याव्यवसायातुन ०१ अल्पवयीन मुलीची सुटका, ०१ महिला आरोपी व ०२ पुरुष आरोपीस अटक
पुणे- धनकवडी येथील “श्री साई लॉजिंग”वर छापा मारून पोलिसांनी वेश्याव्यवसायातुन ०१ अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि ०१ महिला आरोपी व ०२ पुरुष आरोपीना अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१३/०२/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महिला एजंट व पुरुष एजंट हे अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे सहयाने सदर बातमीची खात्री करुन “श्री साई लॉजिंग” येथे अचानक छापा टाकुन एक महिला आरोपी शिरसाठी वय ३५ वर्षे, रा. कामीनी हॉटेल जवळ विजय नगर, चिंचवड गाव पुणे.तसेच अनिल मदन जेधे वय ३५ वर्षे रा. पेपर मिल समोर, साने चौक, चिंचवड पुणे आणि ३) जिवन प्रमादे इंगोले वय ३३ वर्षे, श्री साई लेंजिंग स.नं. ३०, नित्यानंतद सोसायटी, बालाजी नगर बस स्टॉप शेजारी, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे यांना अटक केली त्यांनी वेश्याव्यवसायासाठी “श्री साई लॉजिंग “मध्ये आणलेल्या ०१ पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपीं विरुध्द दि. १३/०२/२०२६ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. ४६/२०२६, भा.न्या.सं १४३, ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, तसेच बालकांचे लैगींक गुन्हयापासुन संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४,१७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार इम्रान नदाफ, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, म. पोलीस अंमलदार रेश्मा कंक, इंगळे गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.

