पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार
पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य माणूस अथवा मध्यवर्गीय किंवा धनाढ्य असा कोणताही भेदभाव न करता सर्रास वाट्टेल तेवढी भरमसाठ,मनमानी कर,वा शुल्क आकारणी करून लोकांना जेरीस आणीत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत असतात,मग ती विजेची बिले असो, महापालिकेचा मिळकत कर असो,Tds असो वा कोणत्याही स्वरूपाची वसूली असो अशा वसुलीच्या रकमेवर,त्यावर लावले गेलेले व्याज यावर कसलाही अंकुश कोणाचाही उरलेला नाही आणि कारवाईच्या धमक्यांनी हैराण माणसे ठिकठिकाणी धक्के खाताना अनेकदा दिसून येतात.ज्या मिळकत कर विभागात बोगस कर्मचारी बसून मिळकत कराची वसूली करताना माय मराठी ने पकडले होते आणि त्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली होती त्या घटनेनंतर काही वर्षानंतर या विभागात पुन्हा देखरेखीची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात असताना काल..भर महापालिकेत..एकाने पिस्तुल काढल्याच्या घटनेने खळबळ उडाली,नेहमीप्रमाणे सीसी टीव्ही दाखविण्यास प्रशासनाने नकार तर दिलाच पण त्यांचे बिल अवाजवी असल्याचा गैरसमज त्यांचा कोणाच्या तरी सांगण्यावरून झाल्याचा पवित्रा मिळकत कर विभागानेघेतला.विशेष म्हणजे 3 वाजता महापालिकेची मुख्य सभा सुरू झाल्यावर महापालिकेच्या मुख्य भवनातील जुन्या इमारतीत असलेल्या मिळकत कर विभागात हा प्रकार घडला, जिथे कर्मचारी आणि अधिकारी बदली होण्यासाठी मोठे प्रयत्न करत असतात तोच हा विभाग..हमारे जेल मे पिस्तूल ?..अशी भूमिका अर्थात या सर्वांनी घेतली आणि पत्रकारांपूढे प्रश्न निर्माण करून ठेवत गायब झाले..पण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा मात्र त्यांनी यांची चांगलीच गंभीर दखल घेतली.महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसमोर पिस्तूल काढून आत्महत्या करण्याची धमकी एका तरुणाने दिली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे, संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. इतकेच नव्हे, तर संबंधित तरुणाकडील शस्त्र जप्त करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्पष्ट केले.
त्यानुसार संबंधित तरुणाविरुद्ध महापालिकेकडून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेमध्ये महापौर,उपमहापौर निवडणुकीवेळी परवानाधारक पिस्तूल असणाऱ्या व्यक्तीचा वावर सुरु होता. हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आला होता, मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, मिळकत कराची थकबाकी असणाऱ्यांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. या योजनेची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. संबंधित योजनेअंतर्गत मिळकत कराबाबत चर्चा करण्यासाठी तरुण महापालिकेच्या मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाकडे आला होता. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मिळकत कर विभागाच्या कार्यालयामध्ये संबंधित तरुणाकडून कर्मचाऱ्यांना थकबाकीबाबत विचारणा करण्यात आली.कर्मचाऱ्यांनी मिळकतकराच्या थकबाकीबाबत माहिती दिल्यानंतर संबंधित कर जादा असल्याचे सांगत तरुण संतप्त झाला. त्याने त्याच्याकडील पिस्तूल बाहेर काढत थेट धमकावले. त्यानंतर, त्याने पिस्तूल स्वतःच्या डोक्याला लावत मी आता आत्महत्या करणार असे सांगत तो कार्यालयाबाहेर आला. या प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेले महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी आवाक झाले.
काही कर्मचाऱ्यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दरम्यान महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांच्यासह एका नगरसेविकेकडूनही संबंधित तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने संबंधित तरुणाच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.
संबंधित व्यक्तीने पीस्तोल का काढले ?खरेच त्याचा मिळकत कर अतिशय जास्त लावला होता आणि म्हणून तो हैराण झालेला होता काय ? की उगाचच तो दमदाटी करत होता ? या सर्व प्रश्नांची उकल करण्याचे काम पोलिस त्याच बरोबर महापालिका आयुक्त आणि महापालिकेतील नगरसेवक यांनाही करावे लागणार आहे.
संबंधित व्यक्तीचे कोविड काळातील बंद अवस्थेतील पुरावे पाहून त्यांचे मिळकत करामध्ये दुरुस्ती आम्ही केली आहे. त्यांचे बिल खूप कमी झाले आहे. पण त्यांना काल कोणीतरी चुकीची माहिती दिली की त्यांचे बिल कमी नाही झाले. आणि मग हा प्रकार घडला. रवी पवार: मिळकत कर विभाग प्रमुख

