अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

Date:

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती. या पार्श्वभूमीवर योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत महापालिका कर विभागाकडून तात्काळ निर्णय घेत अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

अभय योजनेअंतर्गत मिळकतकराच्या थकीत रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून तब्बल ८०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.

“अभय योजनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेचा महसूल वाढवतानाच नागरिकांना मोठी सवलत देणारी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. आणखी काही थकबाकीदारांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक होती. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार. मुदतवाढीमुळे अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन थकीत कर भरावा आणि शहराच्या विकासात योगदान द्यावे”, अशी प्रतिक्रिया गणेश बिडकर यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...

…तर त्यांचे केंद्रातील मंत्रीपद जाईल !” अमोल बालवडकरांचा नेमका कोणाला इशारा

पुणे- निवडणूक लढविल्याने भाजपा मधून हकालपट्टी असे पत्रक कोणाबद्दल...