…तर त्यांचे केंद्रातील मंत्रीपद जाईल !” अमोल बालवडकरांचा नेमका कोणाला इशारा

Date:

पुणे- निवडणूक लढविल्याने भाजपा मधून हकालपट्टी असे पत्रक कोणाबद्दल काढताय ? ज्यांनी पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात गेले आणि तुमच्या नाकावर टिच्चून निवडून देखील आले,अशांच्या नावाचे हकालपट्टी केल्याचे पत्रक काढणे म्हणजे खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्याचे अवमान करणारे राजकारण करणे होय,तुम्ही डावलून हि आम्ही निवडून आलो त्यामुळे यांनी सांगायला हवे होते का डावलले चला त्यांनी नाही सांगितले तरी…माझ्याकडे एक असा विषय आहे की, मी तो काढला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला,तर भाजपच्या केंद्रातील एका मंत्र्याचे निलंबन होईल,” असा अप्रत्यक्ष इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे..अमोल बालवडकर यांनी हा इशारा नेमका कोणाला दिला ? यावर मात्र मौन पाळले असले तरी त्यांच्याबाबत राजकारण झाल्याचे यामुळे स्पष्ट होते आहे .योग्य वेळी आपण तो विषय नक्की काढू असे बालवडकर म्हणालेत पण हा विषय कोणता ? योग्य वेळ कोणती ? आणि केंद्रातले मंत्री कोणते ? असे प्रश्न यामुळे साहजिकच चर्चिले जाऊन राजकारण तापू शकणार आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली. पुणे शहरातील तब्बल ६९ कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये अमोल बालवडकर यांच्सया नावाचा समावेश असल्याने बालवडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बालवडकर म्हणाले की, “आम्ही आता शांत बसलो आहोत. आम्ही निवडून आलो असून जनतेची कामे करायची आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे आम्ही आधीच दुःखात आहोत आणि खचलेलो आहोत. अशा परिस्थितीतही आम्ही काम करत आहोत. त्यामुळे ‘हकालपट्टी’ किंवा ‘निलंबन’ असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत. या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आहे, याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवावी.”. अमोल बालवडकर २०१७ मध्ये ते भारतीय जनता पक्षाकडून बाणेर परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर बालवडकर यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला आणि पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतासह जगभरात इंटरनेटला धोका

युद्धामुळे होर्मुझमध्ये टाकलेल्या केबल्सना नुकसान होण्याची शक्यता; समुद्रात 97%...

पुण्यात महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पुणे : भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणकानिमित्त शहरात विविध धार्मिक...

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी...