पुणे: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)ने आज
महाराष्ट्रातील म्युच्युअल फंड परिसंस्थेमधील पुणे शहराची वाढती भूमिका निदर्शनास आणली,
ज्यासह शहरातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध, दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती साधन म्हणून म्युच्युअल
फंड्समधील त्यांची गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले आहे. एएमएफआयच्या मते, महाराष्ट्र
भारतातील म्युच्युअल फंड उद्योगामध्ये आघाडीवर आहे, जेथे डिसेंबर २०२५ पर्यंत अॅसेट्स अंडर
मॅनेजमेंट (एयूएम) ३२,३९,४८६ कोटी रूपये होते, जे भारतातील एकूण एयूएम ८०,२३,३७९ कोटी
रूपयांच्या ४०.४ टक्के आहे. राज्यामध्ये पुणे शहर ३,१३,२३८ कोटी रूपयांच्या एयूएमसह प्रमुख
गुंतवणूक केंद्र ठरले आहे, जे महाराष्ट्रातील एकूण एयूएमच्या ९.७ टक्के आहे आणि एयूएमसंदर्भात
देशातील चौथे सर्वात मोठे शहर ठरले आहे.
पुणे शहरामध्ये ७९,६५,७०२ म्युच्युअल फंड फोलिओ देखील आहेत, ज्यामधून प्रबळ व व्यापक रिटेल
सहभाग दिसून येतो. शहरातील वाढत्या गुंतवणूकदारवर्गामधून आर्थिक सहभागामध्ये महाराष्ट्राचे
नेतृत्व दिसून येते, ज्याला राज्याच्या प्रबळ अर्थव्यवस्थेचे पाठबळ आहे, जेथे राज्याने भारतातील
जीडीपीमध्ये (२०२४-२५) १३.७ टक्के योगदान दिले आहे.
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स म्हणजेच एसआयपी राज्यभरात शिस्तबद्ध गुंतवणूकीला आकार देत
आहेत. महाराष्ट्रात २,१०,११,८७५ एसआयपी फोलिओ आहेत, जे राज्याच्या एकूण फोलिओपैकी ३५
टक्के आहे आणि देशातील एसआयपी फोलिओंपैकी जवळपास २१ टक्के आहे. महाराष्ट्रातील एसआयपी
एयूएम ४,५०,३८२.६० कोटी रूपये आहे, जे भारतातील एकूण एसआयपी एयूएमपैकी २७ टक्के आहे.
यामधून पुण्यासह राज्यातील कुटुंबे पद्धतशीर गुंतवणूकीचा मुख्यत्वे अवलंब करत असल्याचे दिसून येते.
राज्याच्या या कामगिरीबाबत मत व्यक्त करत एएमएफआयचे चीफ एक्झिक्युटिव्ह श्री. वेकंट
चालासनी म्हणाले, ”पुणे शहर भारतातील म्युच्युअल फंड विकासगाथेच्या पुढील टप्प्याला सादर
करते. शहरातील दृढ आर्थिक मुलभूत तत्त्वे, उद्योजकता संस्कृती आणि वाढता पगारदार वर्ग दीर्घकालीन
गुंतवणूकीला चालना देतात. म्युच्युअल फंड्स वैविध्यीकरण, व्यावसायिक व्यवस्थापन आणि
पारदर्शकता देतात, ज्यामुळे गुंतवणूकदार पारंपारिक बचतींऐवजी संरचित मालमत्ता निर्मितीला प्राधान्य
देत आहेत. प्रत्येक गुंतवणूकदार जागरूकता, शिस्तबद्धता आणि दीर्घकालीन दृष्टिकोनासह गुंतवणूक
करण्याची खात्री घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
गुंतवणूकदारांचा सहभाग देखील वाढत आहे. महाराष्ट्रात १,०६,२३,४१७ अद्वितीय गुंतवणूकदार आहे,
ज्यापैकी ३०.४ टक्के महिला आहेत. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी २६.३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
यामधून महिला गुंतवणूकदारांमध्ये वाढती आर्थिक जागरूकता आणि त्यांचा वाढता सहभाग निदर्शनास
येतो.
महाराष्ट्रात प्रबळ वितरण नेटवर्क देखील आहे, जे गुंतवणूकदारांना साह्य करत आहे. ३१ डिसेंबर २०२५
पर्यंत राज्यामध्ये ८६,६८० एआरएनधारक आणि सहयोगी कर्मचारी आहेत, ज्यापैकी पुण्यामध्ये
१०,४९६ एआरएनधारक व सहयोगी कर्मचारी आहेत, ज्यासह गुंतवणूकदार विभागांमध्ये सल्लामसलत
व सेवा पोहोचण्याची खात्री घेण्यात येत आहे.
भारतातील म्युच्युअल फंड उद्योग विस्तारित होत असताना एएमएफआयने निदर्शनास आणले की
दीर्घकालीन सहभाग, मालमत्ता वाटपामध्ये शिस्तबद्धता आणि एसआयपी-केंद्रित गुंतवणूक आर्थिक
स्थिरता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुण्यातील गुंतवणूकदारांसाठी बचतीसह भारतातील
दीर्घकालीन विकासगाथेमध्ये सहभाग घेण्याकरिता धोरणात्मकरित्या गुंतवणूक करण्याची देखील संधी
आहे.

