सरहदच्या वतीने भारताचे माजी गृहसचिव गोपाल कृष्ण पिल्लई यांचे शनिवारी व्याख्यान

Date:

डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे , नवनीत कांवत, जाहिरोद्दिन हुसेन शेख यांचाही विशेष सन्मान

पुणे
सरहद संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी स्वर्गीय डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते. भारताचे माजी गृहसचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. माधव गोडबोले यांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या व्याख्यानात यापूर्वी जम्मू काश्मीर च्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव खुर्शीद अहमद गनाई, तुकाराम मुंढे, भारताचे पहिले माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला , डॉ. नितीन करीर यांसारख्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.

या व्याख्यानाचे यंदाचे ४ थे वर्ष असून यावर्षी ३० जून २००९ ते ३० जून २०११ या काळात भारताचे गृह सचिव राहिलेले आणि टाटा इंटरनेशनल कंपनीचे विद्यमान अध्यक्ष, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि या देशातील गंभीर विषयांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेले गोपाळ कृष्ण पिल्लई (जी.के. पिल्लई) यांचे उद्या शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वा. पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे “हरवलेले सुशासन ” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे . या प्रसंगी पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले आणि प्रशासकीय पारदर्शकता, सुशासनाचा वारसा पुढे चालवणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मानाने सन्मान करण्यात येतो.

यावर्षी पीएमआरडीएचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. योगेश म्हसे(भा.प्र.से.), सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विशाल नरवडे (भा. प्र.से.) , बीडच्या पोलीस अधीक्षक मा. नवनीत कांवत (भा.पो.से.),डीजीपी कार्यालय , मुंबईचे मुख्य लिपिक मा. जहिरोद्दिन हुसेन शेख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अशी माहिती सरहद संस्थेचे समन्वयक लेशपाल जवळगे आणि सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सभागृह नेतेपदी गणेश बिडकर,महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पुणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक...

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. १२: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका...

एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता; ७०० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...