शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

Date:

पुणे, दि. १२: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका प्रदान समारंभ आज आयोजित करण्यात आला. यावेळी जेनकोव्हल समुहाचे चेअरमेन, दीपक घैसास तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, नियामक मंडळ सदस्य मिलींद धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या समारंभात स्थापत्य,विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्र, संगणक माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग अॅड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्याशाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विदयार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक व व्दितीय क्रमांक मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना मानचिन्हे आणि पारितोषिके देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

श्री. घैसास म्हणाले, यशस्वी उद्योजक होण्याकरीता कार्यक्षेत्राचे ज्ञान, सकारात्मक मनोवृत्ती, उद्योगाबद्दलचा अभिमान, विश्वास या मूल्यांची गुरुकिल्ली दिली. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे महत्व विशद करुन, देश व समाजसेवा करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच डॉ. शिरिष धोबे यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरहदच्या वतीने भारताचे माजी गृहसचिव गोपाल कृष्ण पिल्लई यांचे शनिवारी व्याख्यान

डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे , नवनीत कांवत, जाहिरोद्दिन...

एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता; ७०० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...

भाजपा नगरसेवकांकडून कलाकार कट्टा काढून टाकण्याचा प्रस्ताव -राष्ट्रवादीचा विरोध

पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतराच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध पुणे- शहरातील गुडलक...