भाजपा नगरसेवकांकडून कलाकार कट्टा काढून टाकण्याचा प्रस्ताव -राष्ट्रवादीचा विरोध

Date:

पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतराच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध

पुणे- शहरातील गुडलक चौक, भांडारकर रस्ता येथे असलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित करण्याबाबत भाजपचे नगरसेवक सुनील पांडे व मिताली सावळेकर यांनी दिलेल्या निवेदनाचा राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले कि,’सदर कलाकार कट्टा हा रस्त्याच्या मधोमध नसून फुटपाथच्या एका कोपऱ्यात, बाजूला व्यवस्थित उभारण्यात आलेला आहे. वाहतुकीस कोणताही थेट अडथळा निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊनच तो उभारण्यात आला आहे. उलट, हा कट्टा पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार आणि विविध कला सादर करणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांसाठी एक खुले व्यासपीठ ठरला आहे.

पाटील पुढे म्हणाले,’ अल्पावधीतच या कलाकार कट्ट्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील प्रमुख चौकात असल्यामुळे अनेक कलाकारांना येथे थेट लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. हातावर पोट असलेल्या अनेक कलाकारांना याच कट्ट्यावरून त्यांचा उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत मिळतो. त्यामुळे हा केवळ एक कट्टा नसून शेकडो कुटुंबांचा आधारवड आहे.नगरसेवकांनी वाहतूक कोंडीचे कारण देत हा कट्टा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. परंतु खंडोजी बाबा चौक, गोखले चौक, डेक्कन जिमखाना कॉलनी, बीएमसीसी रस्ता या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या ही अनेक वर्षांपासून आहे. कलाकार कट्टा उभारण्यापूर्वीही येथे वाहतुकीची समस्या होती आणि कट्टा स्थलांतरित केला तरी ती समस्या कायम राहणार आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. वाहतूक कोंडीचे खरे कारण म्हणजे अपुरे रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि नियोजनाचा अभाव — कलाकार नव्हेत.याशिवाय, फुटपाथ मोठा करण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परंतु संबंधित काळात सत्ता कोणाची होती, हे पुणेकर विसरलेले नाहीत. त्या वेळी जर फुटपाथचा विस्तार करण्यात आला असेल, तर त्याची जबाबदारीही त्याच सत्ताधाऱ्यांवर येते. आज त्याच मुद्द्याचा आधार घेऊन कलाकारांना लक्ष्य करणे हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. अशा शहरात कलाकारांसाठी उभ्या राहिलेल्या सकारात्मक उपक्रमाला हटविण्याचे पाप करू नये. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात; परंतु त्यासाठी कला आणि कलाकारांना बळीचा बकरा बनवू नये.

बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या मागण्या

●कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा…
●कलाकारांच्या उपजीविकेचा आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान राखावा…
●वाहतूक समस्येवर तज्ञांच्या सल्ल्याने स्वतंत्र आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास , पुण्यातील सर्व कलाकार, कला प्रेमी आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र
आंदोलन छेडतील असाही इशारा त्यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता; ७०० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...

जुन्नर येथे सय्यद वाड्यात रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेचे उद्घाटन….

पुणे: रुग्णांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्य...