जुन्नर येथे सय्यद वाड्यात रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेचे उद्घाटन….

Date:

पुणे: रुग्णांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना योग्य उपचार मिळावे यासाठी आयएससो मानकित असलेल्या रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेच उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नर येथील सय्यद वाडा येथे करण्यात आलं.रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते या शाखेच उद्घाटन करण्यात आलं.यावेळी जुन्नर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत,नवनिर्वाचित नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली आयएसओ मानांकित संघटना म्हणजे रुग्ण हक्क परिषद असून रुग्ण हक्क परिषदेची स्थापना ०८ एप्रिल २०१४ रोजी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क तथा अधिकार मिळालाच पाहिजे, यासाठीची जनमानसातील लोकप्रिय चळवळीतील संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद सुप्रसिद्ध आहे.रुग्ण हक्क परिषदेने ” कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान” २०२५- २०२९ ही पाच वर्ष कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी समर्पित केलेली आहेत. समाजातील कॅन्सरने घातलेले थैमान त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च मोफत करण्यासाठीच कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत महागडे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.

जुन्नर येथील सय्यद वाडा येथे तालुक्यातील पहिली शाखा सुरू करण्यात आली असून या शाखेचे अध्यक्ष दोस्त मोहम्मद सय्यद तर उपाध्यक्ष म्हणून वफा सय्यद आणि कार्याध्यक्ष म्हणून बाबा हसन सय्यद काम पाहणार आहे. जुन्नर तालुक्यात रुग्णांना एखादा मोठा आजार झाला की त्याला पुण्यासारख्या शहरात विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत अश्या वेळी या रुग्णाला योग्य मार्गदर्शन करने आणि त्यांना उपचार मिळवून देणे हा या संस्थेच मुख्य उद्देश असणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. १२: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका...

एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता; ७०० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...

भाजपा नगरसेवकांकडून कलाकार कट्टा काढून टाकण्याचा प्रस्ताव -राष्ट्रवादीचा विरोध

पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतराच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध पुणे- शहरातील गुडलक...