समाविष्ट २३ गावांचे नियोजन आता महापालिकेकडे

Date:

नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे, दि. १२ फेब्रुवारी : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सन २०२१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीए ची नियुक्ती रद्द करण्यात आली असून, आता पुणे महानगरपालिका नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे.

या संदर्भातील नगरविकास विभागाची अधिसूचना काल प्रसिद्ध झाली. त्यानुसार २३ गांवासाठी विकास आराखडा मंजुरी, बांधकाम परवानग्या, पायाभूत सुविधा उभारणी आणि नागरी सेवा यामध्ये एकसंघ व सुसूत्र नियोजनास गती मिळणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

मिसाळ म्हणाल्या, या निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. पुणे महानगरपालिका, प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि नगर विकास विभाग यांच्यातील प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे दूर केले. विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करून थेट महानगरपालिकेकडे अधिकार हस्तांतरित करण्यात येणार आहेत.”

म्हाळुंगे, सुस, बावधन (बु.), किरकटवाडी, पिसोली, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सनसनगर, मांगेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली या गावांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

“हा निर्णय पुणे शहराच्या सर्वांगीण आणि समतोल विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, समाविष्ट २३ गावांच्या दीर्घकालीन विकासासाठी, नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उभारणीसाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानते.”

माधुरी मिसाळ
नगरविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. १२: शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २६ वा पदविका...

एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता; ७०० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...

भाजपा नगरसेवकांकडून कलाकार कट्टा काढून टाकण्याचा प्रस्ताव -राष्ट्रवादीचा विरोध

पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतराच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध पुणे- शहरातील गुडलक...