मुंबई-
सध्या सोलापूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) विभागातील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 22155 / 22156 कलबुर्गी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) एक्सप्रेस ही दैनंदिन रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, कोणत्याही मार्गावर किंवा विभागात नवीन रेल्वे सेवा सुरू करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून ती खालील विविध घटकांवर अवलंबून असते:
- त्या विभागाची क्षमता
- रेल्वे मार्गाची उपलब्धता
- आवश्यक रोलिंग स्टॉकची उपलब्धता
- रोलिंग स्टॉकसाठी पूरक पायाभूत सुविधांची उपलब्धता
- रेल्वे रूळ आणि इतर मालमत्तेची देखभाल करण्याची आवश्यकता
रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

