फटाका सायलंसर बसविणाऱ्या गॅरेजवर पोलिसांचा छापा– १५ बुलेटचे सायलंसर रोड रोलर खाली चक्काचूर

Date:

पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्वनीप्रदूषण व शांततेचा भंग करणाऱ्या फटाका सायलंसर बसविणाऱ्या दुचाकी वाहनांवर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून वारजे, कर्वेनगर व शिवणे परिसरात पेट्रोलिंग करत १५ बुलेट दुचाकी चालकांवर कारवाई केली.चौकशीत या दुचाकींना मॉडिफाय सायलंसर वारजे येथील रॉयल बाईक सर्विस या गॅरेजमधून बसविण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी गॅरेज मालक योगेश दामोदर सपकाळ (वय ३३) याच्यावर गुन्हा दाखल केला असून भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.जप्त केलेले सर्व मॉडिफाय सायलंसर आरएमडी कॉलेज समोर रोड रोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले. तसेच दुचाकी चालकांचे समुपदेशनही करण्यात आले.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.
वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत बुलेट दुचाकी गाड्यांना मॉडिफाय केलेले व फटाके वार्जावणारे सायलंसर बसवून शांततेचा भंगकरुन ध्वनीप्रदुषण निर्माण करणारे दुचाकीचालक यांच्यावर परिणामकारक कारवाई करा म्हणून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने दिनांक १०/०२/२०२६ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या मागर्दशनाखाली मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायंलसर लावून फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरुध्द कारवाई करणेबाबत पथक नेमून आदेश दिले होते. त्याप्रमाणे कारवाई करणेकरीता तपास पथकाचे पोलीस अधिकारी संजय नरळे व स्टाफ यांनी वारजे, कर्वेनगर, शिवणे भागत पेट्रोलिंग करुन पेट्रोलिंग दरम्यान मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेंसर लावून शांततेचा भंग करणाऱ्या १५ बुलेट दुचाकी चालकांविरुध्द वाहतुक विभागाच्या मदतीने कारवाई करुन सदर दुचाकींचे सायलंसर जप्त केले. तसेच कारवाई केलेल्या दुचाकीचालकांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचे मॉडिफाय केलेले सायलंसर हे वारजे येथिल रॉयल बाईक सर्विस या गॅरेजमधून बसविले असल्याचे सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे सदर गॅरेजमध्ये जावून चौकशी केली असता तेथे सदर गॅरेजचे मालक योगेश दामोदर सपकाळ, वय ३३ वर्षे, धंदा गॅरेज, रा. ओप्यूलन्स बिल्डींग, झील कॉलेज चौक, नन्हे, पुणे हा बुलेट मोटारसायकलला मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलंसर बसवितांना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०,४९, मोटार वाहन कायदा कलम १९० (२) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) सह१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाई दरम्यान जप्त केलेले मॉडिफाय सायलंसर हे आर एम डी कॉलेज समोर रोड रोलरने चकणाचुर करुन दुचाकीचालकांचे समुपदेशन केले आहे. अशा पद्धतीने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मोठ्या आवाजांच्या वाहनांच्या बाबत तक्रार करून नागरिक पोलिसांमार्फत कारवाई करू शकतात . जागृत नागरिकांनी अशा बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.जी अशा प्रकारच्या वाहने निदर्शनास येतील पोलीस त्यावर स्वताहून कारवाई करतील .
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे,अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग,मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम,सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी,पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या देखरेखीत वारजे माळवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीर

चेन्नई- पुण्यातील सरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय...

मुंबई महापालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर, श्रीमती रितू तावडे महापौरपदी विराजमान

मुंबई, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर...

‘एन. ए.’ परवानगी आता इतिहासजमा..बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी,जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

महसूलमंत्र्यांची जमीन महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा-राजपत्र जारी....मुंबई. दि. ११...