महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभेच्छा

Date:

मुंबई l दि. ११ फेब्रुवारी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर आज नवे महापौर लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते दोघांनी पदभार स्वीकारला.

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार उभा नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. या निवडीमुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात येऊन पुन्हा एकदा ‘मेयर राज’ची सुरुवात झाली आहे, असे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

अध्यक्ष सभागृहात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नव्या महापौर व उपमहापौरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, त्यावेळी भूषण गगराणी आणि महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीमध्ये त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयाबद्दल अभिनंदन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आज मुंबईला मराठी महापौर आणि उपमहापौर लाभणे ही अभिमानाची बाब आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून मराठी माणसाला सन्मान आणि संधी देण्याची भूमिका महायुतीने सिद्ध केली आहे. मुंबईच्या सर्वसमावेशक विकासासोबत मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक स्वाभिमान यांचे जतन करणे ही आमची बांधिलकी आहे.”

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून रस्ते विकासासह विविध प्रकल्पांमुळे शहराच्या प्रगतीला वेग आला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांचा वाढलेला सहभाग आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर जनजागृती यामुळे महायुतीला व्यापक जनसमर्थन मिळाले आहे. महापौर रितू तावडे यांनी आपल्या भाषणात महिलांचे प्रश्न, मराठी भाषा व मराठी शाळांचे संवर्धन, मुंबईची सुरक्षितता तसेच बेकायदेशीर घुसखोरीच्या प्रश्नावर ठोस भूमिका मांडली. उपमहापौर म्हणून संजय घाडी यांच्यासारखे आक्रमक व क्रियाशील नेतृत्व लाभल्याने प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेवटी, उपसभापती या नात्याने दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, मुंबईकर जनतेचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

फटाका सायलंसर बसविणाऱ्या गॅरेजवर पोलिसांचा छापा– १५ बुलेटचे सायलंसर रोड रोलर खाली चक्काचूर

पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्वनीप्रदूषण व...

मुंबई महापालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर, श्रीमती रितू तावडे महापौरपदी विराजमान

मुंबई, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर...

‘एन. ए.’ परवानगी आता इतिहासजमा..बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी,जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

महसूलमंत्र्यांची जमीन महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा-राजपत्र जारी....मुंबई. दि. ११...

‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे शहर कृषी-तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने सज्ज विजेत्यास...