‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Date:

पुणे शहर कृषी-तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने सज्ज

विजेत्यास २५ लाख रुपये ; उपविजेत्यास १५ लाख रुपये बक्षीस

पुणे, दि. ११: पुणे शहर आणि परिसराची कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातील आघाडी लक्षात घेऊन, शहराला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाचे ‘हब’ बनवण्यासाठी ‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ या स्पर्धेचे कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५, १६ आणि १७ मे २०२६ या कालावधीत भव्यस्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक : यास्पर्धेत स्पर्धकांना सहभागी होण्याकरिता २३ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाईनपद्धतीने अर्ज स्वीकरण्यात येणार आहे. प्राप्त अर्जाची तज्ज्ञ समितीद्वारे छाननी करुन अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५, १६ आणि १७ मे २०२६ येथे प्रत्यक्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे मुख्य विषय: स्पर्धकांना जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि जमिनीचा पोत राखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्मार्ट जलव्यवस्थापन: पाण्याचा दर्जा, ऑटोमेशन आणि फर्टिगेशनमधील नवकल्पना, शेती यांत्रिकीकरण: शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सचा वापर, कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी: विपणन आणि निर्यातीसह प्रक्रिया तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा: शेतीमधील अक्षय ऊर्जेचा वापर आणि शेतीतील कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण: कीड आणि रोगांचे भाकीत व व्यवस्थापन, हवामान अनुकूल, डिजिटल आणि शाश्वत शेतीमधील बदल आणि शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेली नाविन्यपूर्ण साधने किंवा तंत्रज्ञान या आठ महत्त्वाच्या विषयांवर आधारित आपले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करता येतील.

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे: या स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. अंतिम फेरीतून निवडल्या जाणाऱ्या विजेत्यास २५ लाख रुपये तर उपविजेत्यास १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुणे हे कृषी आणि तंत्रज्ञानाचे संगम केंद्र असून, या हॅकाथॉनच्या माध्यमातून देशातील गुणवंत संशोधकांना आणि शेतकऱ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरु असून ते २३ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...