नोंदणी व मुद्रांक विभागातील गट-ड पदभरतीबाबत उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध

Date:

पुणे, दि.११: नोंदणी व मुद्रांक विभागात गट-ड संवर्गातील २८४ पदे भरतीची प्रक्रिया सुरु असून उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या विभागातील गट-ड पदभरतीसाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत जुलै- २०२५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आणि गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी करण्यात आली असून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी बोलावण्यात येणार आहे. त्याबाबत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर स्थळ व तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी कळविली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या...

एमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा

नव्या धोरणांचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा- प्रादेशिक अधिकारी हनुमंत...