मुंबई-भाजपचे वरिष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांच्यावर हृदयाशी संबंधित उपचार करण्यात येणार असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर नारायण राणे यांचा कणकवली येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या भाषणात आता आपण थकलो असल्याचे वक्तव्य केले होते. आता अजून किती करणार याला काही मर्यादा असाव्यात, असे त्यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी आपली दोन्ही मुले कर्तुत्ववान असून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असून त्यांना आशीर्वाद देताना नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद देखील त्यांना दिला होता.

