अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्न

Date:

महाराष्ट्रातून ७० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती ; एप्रिल २०२६ मध्ये होणार अखिल हिंदू साहित्य संमेलन

पुणे : अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने पुण्यात एक महत्त्वाची नियोजन बैठक सदाशिव पेठेतील पेरूगेट येथील भावे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद कैलासनाथ नंदा यांनी भूषविले. बैठकीस संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांचे सुमारे ७० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी १५ प्रमुख समित्यांची रचना करण्यात आली असून, प्रत्येक समितीत ७ ते ८ प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियोजन प्रक्रियेत हिंदू नेटवर्कचे सुनील सोनवणे, प्रा. डॉ.संजय भांडारकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे श्रीनिवास कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक विभागाचे संजय मुरदाळे, सक्रियपणे सहभागी झाले होते.

बैठकीत संमेलनाच्या कार्यक्रम रचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित अखिल हिंदू साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, कवी कट्टा, हिंदू साहित्यावर आधारित व्याख्याने, धर्मविचार मांडणारे परिसंवाद, तसेच पारंपरिक वाद्य व कला सादरीकरण यांचा समावेश असणार आहे. यासोबतच काही विशेष प्रकट मुलाखतीही घेण्यात येणार आहेत.

तसेच हिंदू धर्मासाठी जागरणात्मक व निःस्वार्थ कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना संमेलनात “हिंदू तेज पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अखिल हिंदू साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीद्वारे संमेलनाच्या तयारीला अधिक गती देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...