अजितदादा पवार यांच्या स्मृती पुणे महापालिकेत कायम उजळत राहणार

Date:

सभागृह नेते गणेश बिडकरांकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांचे तैलचित्र भेट

पुणे (दि ०९): दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्मरण पुणे महापालिकेत कायमस्वरूपी राहावे, या उद्देशाने सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेला स्व. अजितदादा पवार यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. हे तैलचित्र नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले. हे तैलचित्र महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार विजेता अमित ढाणे यांनी साकारले आहे.

महापौर व उपमहापौर निवडीनंतर महापालिकेच्या सभागृहात दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याचा, राजकीय व सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, अशी भावना सभासदांनी व्यक्त केली.

गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया
“स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेसाठी सतत झटणारे लोकनेते होते. पुणे शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे तैलचित्र महापालिकेत कायमस्वरूपी राहावे, जेणेकरून भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, यासाठी ही आदरांजली अर्पण केली आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...

हा तर भ्रष्टाचाराचा एक्सप्रेसवे!स्मार्ट सिटी नको, निदान एक्सप्रेसवे तरी स्मार्ट करा

— अनंत गाडगीळ यांची सरकारवर खरमरीत टीका मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी...

नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकरांचा आदर्श निर्णय,नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र....

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक...