दीपक पायगुडे, लता राजगुरू यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव

Date:

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संतसाहित्याविषयी आस्था होती. संत तुकाराम महाराज यांची ओवी ‘मूक नायक’ वृत्तपत्रामध्ये ब्रिदवाक्य म्हणून प्रसिद्ध केली जात असे. महामाता रमाई यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावे देण्यात येत असलेला पुरस्कार ही योग्य कृती आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे आयोजित महामाता रमाई महोत्सवात आज (दि. ७) रमाईरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याने महोत्सवाचा समारोप झाला. माजी आमदार दीपक पायगुडे आणि लताताई राजगुरू यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. पंचशील शाल, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, संयोजक विठ्ठल गायकवाड, बार्टीचे संचालक सुनील वारे, के. एस. सूर्यवंशी, कुणाल राजगुरू, बाबू वागस्कर, मेहबुब नदाफ मंचावर होते.

सुरुवातीस महोत्सवाच्या १३ वर्षांतील वाटचालीचा आढावा ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात सादर केला. चांगल्या कामाचा संकल्प करणे ही खऱ्या अर्थाने महामाता रमाई यांना आदरांजली ठरेल, असे मत सचिन ईटकर यांनी व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना दीपक पायगुडे म्हणाले, सामाजिक कार्य करणे वाटते तितके सोपे नाही. कौतुक होते त्याचप्रमाणे टीकाही सहन करावी लागते. सामाजिक कार्यातील वाटचालीसाठी महामाता रमाई यांच्या नावे मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी ठरेल. पुरस्काराविषयी लता राजगुरू यांनी आनंद व्यक्त केला. सुनील वारे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार कुणाल राजगुरू यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...