‘शून्य कचरा प्रकल्पा’त दररोज कचरा संकलन-आमदार हेमंत रासने यांची माहिती

Date:

पुणे, ता. ६ : कसबा-भवानी विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा प्रकल्पा’त अतिरिक्त ४०० कचरावेचकांची नियुक्ती करण्यात आली असून, आता या परिसरात ‘स्वच्छ संस्थे’च्या माध्यमातून दररोज कचरा संकलन करणार असल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ, नगरसेवक अजय खेडेकर, कुणाल टिळक, स्वरदा बापट, पल्लवी जावळे, कल्पना बहिरट, स्नेहा माळवदे, ऐश्वर्या थोरात, विशाल धनवडे, देवेंद्र वडके, राघवेंद्र मानकर, महेश आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, “कचरावेचकांची संख्या वाढल्याने सुट्टीच्या दिवशी ही कचरा संकलनाची अखंडित सेवा देता येणार आहे. जुने वाडे, चाळी, बैठी घरे आणि वस्ती विभागातील रहिवाशांवर सेवा शुल्काचा भार पडू नये यासाठी महानगरपालिका कचरावेचकांना दरमहा घरटी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देणार आहे. लक्ष्मी रस्ता परिसरातील दुकाने आणि पथारी व्यावसायिकांकडून संध्याकाळीही कचरा संकलित केला जाणार आहे.”

राम म्हणाले, “डिसेंबर २०२६ पर्यंत पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. गेले वर्षभर आमदार रासने यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. बहुतांश फिडर पॉईंट व क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘शून्य कचरा प्रकल्प’ या मतदारसंघात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात राबवला जाणार आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्या 12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:2193 जागा, 7438 उमेदवार; 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार करणार फैसला

मुंबई-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या...

मोदी मजा करत आहेत, परदेशात जात आहेत..त्यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत...

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....