पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. काळुराम भुजबळ; उपाध्यक्ष पदी ॲड. कांताराम नप्ते, ॲड. प्रतापराव मोरे

Date:

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी व चुरशीच्या लढतीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड.विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. ॲड. भुजबळ यांना तीन हजार ८०७ मते मिळाली. बुधवारी (ता. ४) मतदार झाल्यानंतर गुरुवारी (ता.५) दुपारी एकपर्यंत मतमोजणीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.

यंदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला, अशी भावना मतदार वकील व्यक्त करत आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत ॲड. कांताराम नप्ते हे ३ हजार ६१९ मते तर ॲड. प्रतापराव मोरे हे 2 हजार ७०६ मते घेऊन विजयी झाले. महिला राखीव गटातून ॲड. प्रितीसिंह परदेशी यांनी ३ हजार ४७ मते मिळवीत विजय मिळवला.

सचिव पदाच्या दोन जागांसाठी ॲड. सम्राट जांभूळकर आणि ॲड. अभिजित पोळ हे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे ४ हजार २७२ आणि ३ हजार ३४४ मते मिळाली. महिला राखीव गटातून ॲड. पूजा पवार यांनी ३ हजार ८७६ मते मिळवीत विजय संपादन केला. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत ॲड. अंजली बांदल यांनी वर्चस्व राखत ५ हजार २७४ मते मिळविली. ऑडिटर पदासाठी झालेल्या लढतीत ॲड. शिवराज निंबाळकर यांना ५ हजार २९० मते मिळाली. तर महिला गटातून ॲड. नेहा जांभळे यांनी ४ हजार ४ मते मिळवली.

कार्यकारिणी सदस्यपद बिनविरोध

कार्यकारिणी सदस्यपदी सर्वसाधारण गटातून मयूर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रीतेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली आहे. तर, महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शीतल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियांका घाडगे यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...