निवडणुकीच्या काळात १९८ कंडक्टरना क्लार्कचे प्रमोशन,१३ निलंबित कर्मचारी कामावर रुजू चौकशीचे आदेश

Date:

सर्व नियुक्त्या आणि बढत्यांना स्थगिती द्या केसकर

पुणे- पी एम पी एम एल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी निवडणुकीच्या काळात बेकायदा बढत्या आणि इतर बाबी केल्याच्या तक्रारीवरून सध्याचे PMPML चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी पी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत या चौकशी साठी त्यांनी सहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यंच्या अध्यक्षतेखाली तरी सदस्यीय समिती नेमली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय थोरात आणि PMPML चे मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक सुरेश खेडकर यांचा या समितीत समावेश आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी चौकशी तर कराच पण तत्पूर्वी या साऱ्या नियुक्त्या आणि बढत्या तातडीने स्थगित करा अशी मागणी केली आहे
त्यांनी असेही म्हटले आहे कि,’पी एम पी एम एल ही कंपनी असून संचलनातील तुटीसाठी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्याकडून निधी दिला जातो.पी एम पी एम एल यांच्या मालकीच्या ६९० बसेस असून त्यापैकी ४५० ते ४७५ बसेस या रस्त्यावर धावत आहेत.

खालील बाबींकडे उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी लक्ष वेधले आहे.
१) सरासरी २०० बसेस या बंद अवस्थेमध्ये असतात.
याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
२) १३ निलंबित कर्मचाऱ्यांना कुठलीही कार्यपद्धती न अवलंबता मागील व्यवस्थापकीय संचालकाने कामावर रुजू केले होते.
३) नवीन २६ स्टॅन्ड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली त्यांचा बेसिक पगार ३५ हजार रुपये आहे.
४) १९८ कंडक्टर आणि इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना क्लार्कचे प्रमोशन दिले गेले आहे.
५) एका कर्मचाऱ्याला पहिल्यांदा क्लासेचे प्रमोशन दिले आणि नंतर त्यांना जनसंपर्क अधिकारी हे प्रमोशन दिले गेले. त्याचा बेसिक पगार S-13 ३५४०० इतका केला गेला क्लार्क म्हणून नियुक्ती १०६ नंबर वर ३० जानेवारी २०२६ रोजी दिली आणि त्याच दिवशी लगेच जनसंपर्क अधिकारी या पदावर पदोन्नतीने निवड केली असे दोन्ही आदेश आहेत.
६) ज्यांना क्लार्क म्हणून बढती दिली त्यामध्ये कायम कंडक्टर, कायम क्लिनर, शिपाई, झाडूवाला, ड्रायव्हर या हुद्द्यावरील सेवकांना क्लार्क केले.
६) सीनियर फोरमन या पदावर पदोन्नती ८ अधिकाऱ्यांना दिली जे क्लिनर म्हणून काम करत होते त्यांचा बेसिक पे हा १९७०० होता पदोन्नती नंतर तो ३२००० झाला म्हणजे बेसिक मध्ये १२ हजार ९०० रुपये वाढवले.
७) जनसंपर्क अधिकारी हे कंडक्टर होते त्यांचा बेसिक पे २६४०० होता तो त्याच दिवशी ३५४०० केला.
८) कामगार कल्याण अधिकारी या पदावर क्लार्क पदावरील व्यक्तीची नेमणूक केली त्यांचे शिक्षण लॉची डिग्री याची कशाची तपासणी झाली का नाही हे कळण्यास मार्ग नाही, बेसिक मध्ये ७००० रुपयाची वाढ झाली.
९) डेप्युटी चीफ मॅनेजर या संवर्गाच्या रिक्त जागेवर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने निवड करण्यात आली आहे अशा एकंदरीत जागा ५ आहेत ते डेपो मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत त्यांचा बेसिक पे हा ५६ हजार ९०० असून पदोन्नती पदोन्नती नंतर त्यांचा बेसिक पे १,३२,३०० इतका झाला आहे.
१०) कॉम्प्युटर प्रोग्रामर या जागेवर कंडक्टर प्रवर्गातील अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे.
आणि या सर्व ऑर्डर काढल्या तेव्हा निवडणूक आचारसंहिता होती.
CNG बसेस हा विषय सविस्तरपणे आपणाकडे देतो आज फक्त जी संस्था इतर संस्थांच्या आर्थिक मदतीवर चालू आहे त्या संस्थेमध्ये जो गोंधळ झालेला आहे त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.
पुणेकर खिशामध्ये पैसे घेऊन बस ची वाट बघतात आणि पी एम पी एम एल स्वतःच्या संस्थेची कशी वाट लावतात याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीए चे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांचे वृत्तपत्रातील quotes बघितले आहे त्यांना या सगळ्या प्रकाराची अजिबात माहिती नाही असे वाटते.पृथ्वीराज बिपी यांच्याकडे PMPML चा अतिरिक्त कार्यभार आहे त्यांनी याबाबतची सर्व कागदपत्रे मागवून या सर्व प्रकाराला तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...