अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

Date:

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव!

पुणे: पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेत भारतीय जनता पार्टीकडे ११९ नगरसेवकांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची असली, तरी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे, अशी माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, या दुःखद प्रसंगी पक्षातील सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमधून महापौर व उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच पहिल्याच मुख्य सभेत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी स्वर्गीय अजितदादांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी...

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर...

स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी ऍक्सिस बँकेची एमएसएमईसाठी रूफटॉप सोलर फायनान्स योजना

मुंबई, 5 फेब्रुवारी, 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या...

महात्मा गांधी यांची ७८ व्‍या पुण्यतिथी दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त...