महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

Date:

पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना श्री. सनी विनायक निम्हण (विश्वस्त, श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच नगरसेवक, पुणे महानगरपालिका) यांनी सांगितले की, महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना स्वच्छ व पवित्र वातावरणात दर्शन घेता यावे, तसेच आरोग्यदायी आणि सुरक्षित परिसर उपलब्ध व्हावा, हा या स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात नागरिकांनी, शिवभक्तांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सामूहिक सहभागातून मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव! पुणे: पुणे महानगरपालिकेतील...

स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी ऍक्सिस बँकेची एमएसएमईसाठी रूफटॉप सोलर फायनान्स योजना

मुंबई, 5 फेब्रुवारी, 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या...

महात्मा गांधी यांची ७८ व्‍या पुण्यतिथी दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त...

काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर.

पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७,...