पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महात्माजींच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थित सर्वांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीजींच्या १९४२ च्या इंग्रज ‘चले जाव’ या घोषनाने सर्व देश पेटून उठला. १९४२ च्या आंदोलनात युवक, विद्यार्थी, तरूण या शिवाय या आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे देशभरातील महिला मोठ्या संख्येने या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झाल्या. अनेक काँग्रेसजणांबरोबर महिलानांही तुरूंगवास सहन करावा लागला. पुण्यामध्ये बरीच वर्षे आगाखान पॅलेस मध्ये महात्माजी व कस्तुरबा यांचे वास्तव्य होते. आगाखान पॅलेसमध्ये असताना गांधीजींचा सातत्याने पत्र व्यवहार चालू असे. ‘चले जाव’ चळवळी नंतर इंग्रजानो भारत सोडा, स्वातंत्र्य द्या असा पत्रव्यवहार चालू ठेवला. इंग्रजांना जनता स्वस्थ बसू देईना आंदोलन सतत चालू होते. अखेर १९४७ ला इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य दिले. परंतु पाकिस्थान वेगळा देश केला. त्यानंतर नौखाली येथे मोठी दंगल झाली तेथे स्वत: गांधीजी गेले व शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य केले. अशा या महान मानवतावादी नेत्यास मी शतश: प्रणाम. करतो.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अजित दरेकर, प्राची दुधाने, द. स. पोळेकर, नवनिर्वाचित नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, प्रशांत जगताप, रफिक शेख, अविनाश साळवी, सायरा शेख, अश्विनी लांडगे, विशाल मलके, रामचंद्र कदम, दिपाली डोख, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव, साहिल केदारी, तसलिम शेख, आसिया शेख, काशिफ सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

