अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

Date:

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डंबाळे यांचे मुख्यमंत्री फडणवीस व महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते कै. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याच्या उभारणीत तसेच पुणे शहराच्या विकासात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ पुणे शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम  यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कै. अजितदादा पवार यांचे पुणे शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पुणे शहराच्या उभारणीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली असल्याने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे यथोचित स्मारक उभारणे आवश्यक आहे.

संगमवाडी येथे पुणे महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या संगमघाटावर कै. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारावा तसेच त्यांच्या कार्याचा वारसा जपणारी शिल्पसृष्टी निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात किमान दहा कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक हे पुणे शहरातील नागरिकांसाठी कै. अजितदादा पवार यांच्या आठवणी कायम ठेवणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डंबाळे यांनी व्यक्त केला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चीन प्रश्नी भूमिका स्पष्ट करा, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करा

केंद्रातील मोदी सरकारविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन. मुंबई, दि. ४...

​पुण्यात ‘हेरिटेज यात्रा २०२६’चा दिमाखदार प्रारंभ; भारतीय संस्कृती जतन करणे काळाची गरज – आदिनाथ मंगेशकर

​पुणे: भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका...

केळेवाडी येथील शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सानिका हिची धमाकेदार कामगिरी…

पुणे-केळेवाडी , पौड फाटा, येथे राहणाऱ्या कु. सानिका...

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द…; मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे-पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक...