डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्य कार्यक्रमास बँकाॅक येथे मोठा प्रतिसाद

Date:


पुणे : सुप्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या शिष्या यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम बँकाॅक येथे सादर झाला. रंगतदार झालेल्या या कार्यक्रमाला परदेशी प्रेक्षकांचा प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाला.

बँकाॅक मधील एंबेसी ऑफ इंडिया येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र येथे दिनांक २९ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या समवेत निकिता मोघे, भावना सामंत, पद्मिनी सोनावणे, समृद्धी कुलकर्णी, प्रेरणा भिंगारे, अनुष्का सामंत, अपूर्वा नीला, हर्षदा केदार या कलाकारांनाही कथक नृत्यातील विविध प्रकार सादर केले. गणेश वंदना, पं.बिरजूमहाराजांचे भजन, तोडे, परण, ठुमरी, तराना, राम भजन, होरी आदी कथक नृत्य प्रकारांचे सादरीकरण केले. कार्यक्रमास एंबेसी ऑफ इंडियाचे संचालक डाॅ. चैतन्य प्रकाश योगी, सेक्रेटरी संतोष सिंग, सांस्कृतिक संचालक संतोष कुमार, विश्व हिंदू परिषद, थायलंड च्या अध्यक्षा वैशाली उरूमकर हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आई.सी.सी.आर ) बँकाॅक यांचे महत्त्वाचे सहकार्य होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...