२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

Date:

पुणे – एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने ऑलिव्ह हॉटेल बाणेर (४८ कीज) आणि ऑलिव्ह हॉटेल वाकड (३० कीज) या दोन महत्त्वाच्या मालमत्तांचे सादरीकरण करत आज पुण्यात अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. पुण्यातील प्रमुख व्यवसाय-जीवनशैली विषयक मायक्रो-मार्केट्समध्ये महत्वाच्या ठिकाणी स्थित असलेली ही हॉटेल्स शहरातील वेगाने वाढणाऱ्या आयटी कॉरिडॉर्स, कॉर्पोरेट हब्स आणि विस्तारत असलेल्या निवासी क्षेत्रांना लक्षात घेऊन उभारण्यात आली आहेत.


या दोन्ही मालमत्तांचे उद्घाटन हा भारतातील प्रमुख महानगरांमध्ये ऑलिव्हच्या आक्रमक विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंजवडी हे भारतातील सर्वात मोठे आयटी हब, झपाट्याने विकसित होणारी पायाभूत सुविधा आणि वाढती व्यावसायिक प्रवासाची मागणी यांमुळे पुणे हे तंत्रज्ञान-सक्षम, कार्यक्षम हॉस्पिटॅलिटीसाठी उच्च क्षमतेची बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे.

“पुणे हे नाविन्यपूर्णता आणि उद्योगाचे केंद्र असून येथील व्यावसायिकांच्या वेगाशी जुळणाऱ्या स्मार्ट निवास व्यवस्थेची मागणी सातत्याने वाढत आहे,” असे ऑलिव्ह बाय एम्बसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक काहरामान यिगित यांनी सांगितले. “ऑलिव्ह हॉटेल बाणेर आणि वाकड ही आमच्या खास एआय-आधारित मॉडेलवर चालणारी हॉटेल्स असून आयटी पार्क्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन्सना अखंड, विनाअडथळा आणि सोपा, सुलभ प्रवेश देतात. या शुभारंभामुळे आमचे पुणे महानगरातले स्थान अधिक भक्कम होत असून पुण्याच्या पुढील वाढीच्या टप्प्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.”

ऑलिव्ह हॉटेल बाणेर हे प्रस्थापित बाणेर परिसरात स्थित असून कॉर्पोरेट सुलभता आणि सक्षम सामाजिक पायाभूत सुविधांचा संगम येथे साधण्यात आला आहे. ऑलिव्ह हॉटेल वाकड हे हिंजवडी प्रवाशांसाठी आणि दीर्घकालीन वास्तव्यासाठी उच्च मागणी असलेल्या वाकड भागात अतिशय योग्य ठिकाणी उभारले असून, वेस्टगेट बिझनेस पार्क आणि मुंबई–पुणे एक्सप्रेसवे येथे त्वरित जाता येऊ शकते. हे हॉटेल विशेषकरून आयटी सल्लागार, प्रोजेक्ट टीम्स आणि दीर्घकालीन व्यावसायिक वास्तव्यासाठी परिपूर्ण आहे.

पश्चिम भारतातील ऑलिव्हच्या वाढीचे केंद्र म्हणून पुणे महत्त्वाची भूमिका बजावत असून, २०३० पर्यंत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, हडपसर, कल्याणी नगर, एमजी रोड, विमान नगर आणि कोरेगाव पार्क यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या कॉरिडॉर्समध्ये ४० हून अधिक  हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीज उभारण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय पातळीवर, ऑलिव्ह २०२६ मध्ये १०० हून अधिक नवीन ठिकाणी विस्तार करण्याचे लक्ष्य ठेवत असून बंगळुरू, म्हैसूर, चिकमंगळूर, विजयवाडा आणि आता पुणे या नेटवर्कवर आधारित ही वाढ साध्य केली जाणार आहे. अलीकडील काळात सादर करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ओपन हॉटेल्स (जगातील पहिले रिमोट एआय ऑपरेटर) तसेच १५० स्पार्क हॉटेल्ससाठी हिल्टनसोबतची भागीदारी यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...