आठवणींना पुस्तक रूपाने शब्दबद्ध करण्याचा आनंद मोठा- डॉ. मुकेश शर्मा.

Date:

पुणे-आपण शेकडो लोकांना भेटत असतो. त्यांचे निरीक्षण करीत त्यांच्या आठवणी शब्दात उतरवणे ही सुंदर कला आहे. त्यातून तयार झालेले साहित्य मनाला आनंद देते. प्रत्येकानेच जीवनातील आठवणींना लिखाणातून उजाळा देत सदैव कृतज्ञता व्यक्त करावी. ‘मला भावलेली माणसे’ हे पुस्तक एखाद्याला आठवणीत ठेवण्यास आणि कृतज्ञ राहण्यास प्रेरित करते. तसेच साहित्यातील सहप्रवासी बनल्याचा देखील आनंद देते. मानवी अनुभवांना मूर्त रूप देणे हे एक महत्त्वाचे काम आहे. असे उद्गार मुंबई दूरदर्शनचे माजी महासंचालक व एम.आय.टी. च्या जर्नालीझम व फिल्म विभागाचे डायरेक्टर डॉ. मुकेश शर्मा यांनी आज काढले. ’मला भावलेली माणसे’ या सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. दयानंद घोटकर होते. नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ज्योस्त्ना जगन्नाथ कुलकर्णी व जगन्नाथ कुलकर्णी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. दयानंद घोटकर यांनी तन्मयी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले: “तन्मयी उत्तम गाते, तबला वाजवते, कीर्तन करते आणि आता लिहिते सुद्धा. हे सर्व गुण एकाच ठिकाणी असणे दुर्मिळ आहे” असे सांगून ते म्हणाले की, जे बोलले जाते ते हवेत विरून जाते, पण जे छापले जाते ते अक्षर (अक्षय) राहते. त्यामुळे लिहीत रहा” असे त्यांनी सांगितले.

वेदशास्त्रोत्तेजक सभागृह पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी स्वामी समर्थ प्रतिमा पूजन आणि त्यानंतर ‘निघालो घेऊन’ दत्ताची पालखी गाण्याचे गायन तन्मयी यांनी केले. पुस्तक प्रकाशन व ई-बुक आवृत्ती प्रकाशन झाल्यानंतर प्रकाशक तनया-इशा प्रकाशनचे प्रवीण.प्र.वाळिंबे. यांनी प्रास्ताविक केले. नचिकेत मेहेंदळे व अनिकेत कुलकर्णी  यांनी पाहुण्यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत केले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ज्योस्त्ना जगन्नाथ कुलकर्णी व श्री. जगन्नाथ कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली. ह भ प. कीर्तन विशारद सौ. निवेदिता खळदकर – मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. हुजूरपागा प्रशाला,पुणेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास साहित्यप्रेमींची मोठी गर्दी होती.

‘मला भावलेली माणसे’ या पुस्तकात लेखिका सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी त्यांना भेटलेल्या पं. विश्व मोहन भट्ट, डॉ सतीश आळेकर, अर्चना कान्हेरे, उल्हास दादा पवार, बेगम परवीन सुलताना, डॉ विश्वास मेहेंदळे, डॉ कुमार सप्तर्षी, डॉ रेवा नातू, डॉ मोहनकुमार दरेकर, कै. मुक्ता टिळक, विदुषी कौशिकी चक्रवर्ती, पं. विजय घाटे, नॅशनल क्रश, गिरीजा ओक – गोडबोले,अभिनेते दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, पं. अतुलकुमार उपाध्ये, उस्ताद उस्मान खान, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, तालयोगी पं. सुरेश तळवलकर गुरुजी, पं. उल्हास कशाळकर, अभिनेत्री,रोहिणी हट्टंगडी यांची भावपूर्ण अशी हृदय व्यक्तिचित्रे आर्टिफिशियल इन्टॅलिजन्सच्या डिझायनींग चा वापर करून लिहिली आहेत. मराठी भाषेतील हे एआय डिझायनिंगचा वापर करून तयार केलेले ललित व्यक्तीचीत्रण लेखांचे पुस्तक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्य कार्यक्रमास बँकाॅक येथे मोठा प्रतिसाद

पुणे : सुप्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या...

२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

पुणे – एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने...

10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान पत्रकार भवन येथे ‘पासपोर्ट मोबाईल व्हॅन’ या उपक्रमाचे आयोजन

पुणे- पुणे येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने (आरपीओ) मंगळवार, दिनांक...

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने...