पुणे-
पुणे येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने (आरपीओ) मंगळवार, दिनांक 10 ते शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे – 411030 येथे मोबाईल व्हॅनद्वारे पारपत्र सेवा प्रदान केली जाणार आहे.\
पारपत्रासाठी लवकर तारीख उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांसाठी शेवटच्या टप्प्यातील पारपत्र सेवा सुधारण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.
आवश्यक कागदपत्रे: ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अर्जदारांनी कृपया पुढे दिलेली कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक वाचावी.
[अर्जदाराच्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी, पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 5 आणि पासपोर्ट नियम 1980 च्या नियम 5 मध्ये असे नमूद केले आहे, की पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते आणि अर्जाच्या योग्य विल्हेवाटीसाठी पासपोर्ट प्राधिकरणाला आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्यास अर्जदाराला सांगू शकते.]
मोबाईल व्हॅन सेवेच्या वेळेसाठी नोंद कशी करावी:
- पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) ला भेट द्या आणि सर्वसाधारण सेवा योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.
- ऑनलाइन पद्धतीने शुल्कभरणा केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’ यावर जा, ‘मोबाइल व्हॅन’ हे स्थान निवडा आणि वेळ निश्चित करा.
पारपत्र मोबाईल सेवा केंद्राची तारीख आणि स्थान तपशील:
- कालावधी: मंगळवार, 10 ते शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026.
- स्थळ: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे, 411030
- वेळ: सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:00
(अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित रहावे)

