हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयात आयटी सेल सज्ज

Date:

हवेली (पुणे): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयात संगणक, एसएमएस मॉनिटरिंग व कम्युनिकेशन (आयटी सेल) प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने या कक्षामार्फत विविध महत्त्वाची कामे राबवली जात आहेत.
या आयटी सेलमध्ये श्री. शुभम वाबळे, श्री. अभिषेक धुमाळ, अक्षय ओव्हाळ, गणेश शिसोदे, मयुर शेवाळे, विनायक शिंदे आणि श्री. वैभव मोटे यांचा समावेश असून सर्वजण निवडणूक प्रक्रियेसाठी तांत्रिकदृष्ट्या समन्वय साधण्याचे काम करत आहेत.
आयटी सेलमार्फत जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळांचे नियमित अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. त्यासोबतच स्थानिक निवडणूकविषयक बातम्या, छायाचित्रे व आवश्यक माहिती वेळेत अपलोड केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या विविध निवडणूक अॅप्लिकेशन्सची अंमलबजावणी करून त्यांचा वापर सुलभ व्हावा यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा, सॉफ्टवेअर व अन्य तांत्रिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम आयटी सेलकडून केले जात आहे. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगसाठी मतदान केंद्रांची यादी निश्चित करणे, आवश्यक तांत्रिक नियोजन करणे तसेच मतदानाच्या दिवशी थेट मॉनिटरिंगसाठी स्वतंत्र स्क्रीन, टीव्ही व इंटरॲक्टिव्ह पॅनलची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्री-पोल डे व पोल डे दरम्यान मॉनिटरिंग, कम्युनिकेशन व रिपोर्टिंगसाठी मोबाईल व वेब आधारित अॅप्सचा वापर करण्यात येत असून ईव्हीएम, कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती संकलन व अहवाल सादर करण्याचे काम सुरू आहे. तसेच ईव्हीएम स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीची व्यवस्था करून रेकॉर्डिंग व बॅकअप सुरक्षितपणे जतन करण्यात येत आहे.
याशिवाय कम्युनिकेशन रूम स्थापन करून संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली असून मतदार यादी, मतदार नाव शोध सर्च इंजिन व निवडणूकविषयक सर्व सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन आयटी सेलमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह ठरण्यास मदत होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या...

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...