चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत : पुष्कराज पाठक

Date:

पुणे : कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रकाश गुंफेकर यांचा भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाच्या वतीने आज (दि. २) अभिनव जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारतीय कलाप्रसारिणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.

अभिनव कला महाविद्यालयातर्फे सावित्रीबाई फुले स्मारक येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘अभिनव कला व्यूह २०२६’प्रदर्शन आणि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रा. प्रकाश गुंफेकर यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

न्यासाचे दिवंगत सचिव बी. एम. पाठक यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य विलास चोरमले, संजय भारती, माजी प्राचार्य राहुल बळवंत, संमेलन प्रमुख अर्पिता कोल्हटकर, सतिश काळे, प्रा. गाडेकर, प्रा. बोरावके उपस्थित होते. सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिवन कला महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत जीवन गौरव पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रा. प्रकाश गुंफेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

प्रकाश गुंफेकर यांच्या कार्याचा पुष्कराज पाठक यांनी गौरव केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुष्कराज पाठक म्हणाले, निरक्षरांना देखील वाचता येते अशी भाषा कला आहे. चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत असते. आपण सर्वजण कलेचे उपासक आहात. कलेचा आनंद घेताना इतरांनाही आपल्या कलेत सामवून घेतल्यास त्याचे समाजातील स्थान वेगळे असते.

अभिनव कला महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक कलाकार उदयाला आले असल्याचे प्राचार्य विलास चोरमले यांनी गौरवाने नमूद केले. तर अभिनव महाविद्यालय एक कुटुंब असल्याचे सांगून संजय भारती म्हणाले, महाविद्यालयाचा वारसा प्रत्येक विद्यार्थ्यांने जपावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता देशपांडे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली नेतृत्वाची संधी

महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा...

स्टार हेल्थ:तिस-या तिमाहित निव्वळ नफ्यात ४१४ टक्क्यांनी वाढ, ४४९ कोटींचा नफा

दाव्यांच्या प्रमाणात घट झाल्यामुळे स्टार हेल्थच्या कंम्बाइण्ड रेशिओमध्ये ३१७...

उद्या दुपारी निश्चित होतील पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ..

पुणे- महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक एवढे बळ असल्याने हा...

महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त,आता अनिरुद्ध पावसकर नवे नगर अभियंता ..

पुणे : पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत...