स्टार हेल्थ:तिस-या तिमाहित निव्वळ नफ्यात ४१४ टक्क्यांनी वाढ, ४४९ कोटींचा नफा

Date:

दाव्यांच्या प्रमाणात घट झाल्यामुळे स्टार हेल्थच्या कंम्बाइण्ड रेशिओमध्ये ३१७ बेसिसस पॉइंट्सची सुधारणातिस-या तिमाहित ९८.९ टक्क्यांवर झेप

चेन्नई, : देशातील आरोग्य विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या स्टार हेल्थ एण्ड अलाइड इन्शुअरन्स कंपनी लिमिटेडने आज आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिस-या तिमाहीपर्यंतचे आर्थिक निकाल जाहीर केले. आयएनडी एएस (आएफआरएस-आर्थिक अहवाल सादरीकरणाचे जागतिक मानक) या लेखा मानांकनानुसार, कंपनीने ४४९ कोटींचा करानंतरचा नफा नोंदवला आहे. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४१४ टक्क्यांनी वाढलेला आहे. प्रीमियममधील वाढ, दाव्यांच्या प्रमाणात झालेली घट आणि कामकाजातील सुधारित कार्यक्षमता यांमुळे हे घवघवीत यश साधता आल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. जागतिक स्तरावरील पारदर्शक अहवाल पद्धती आणि आर्थिक तत्त्वांचे पालन करण्यासाठी स्टार हेल्थ कटिबद्ध असल्याचे कंपनीने यावेळी अधोरेखित केले.

कंपनीने आपल्या मजबूत व्यावसायिक गतीचा लाभ घेत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिस-या तिमाही अखेर ५ हजार ४७ कोटींचा ग्रॉस रिटर्न प्रीमियम नोंदवला असून, यात मागील वर्षाच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिटेल विभागातील प्रीमियम २७ टक्क्यांनी वाढल्याने ४ हजार ८३८ कोटी रुपयांवर पोहोचला आगे. रिटेल क्षेत्रातील या यशाचे कारण म्हणजे नवीन ग्राहकांकडून मिळणा-या प्रीमियममध्ये झालेली ६० टक्क्यांची प्रचंड वाढ. या वाढीमुळे कंपनीच्या आर्थिक भरभराहटीला मोठा हातभार लावला आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने १३ हजार ८५६ कोटींचा ग्रॉस रिटन प्रीमियम नोंदवला. यात मागील वर्षाच्या तुलनेत १६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या कालावधीत रिटेल आरोग्य विमा क्षेत्रात  २० टक्क्यांनी वाढ नोंदवत १३ हजार १७० कोटींचा टप्पा गाठला आहे; यामध्ये नवीन पॉलिसीधारकांकडून मिळणा-या प्रीमियममध्ये झालेली ३७ टक्क्यांची वाढ फार महत्त्वाची ठरली. स्टार हेल्थ कंपनी देशाच्या रिटेल आरोग्य विमा क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून आपले नेतृत्व कायम ठेवत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

आर्थिक वर्ष २०२६च्या तिसया तिमाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये –

          व्यवसाय वृद्धी कंपनीने जमा केलेला एकूण प्रीमियम २३ टक्क्यांनी वाढून  हजार ४७ कोटींवर पोहोचला आहे.

§  निव्वळ नफा: कंपनीने ४४९ कोटींचानिव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित हा नफा ८७ कोटींवर होता. यंदा ४१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

§  कंम्बाइन्ड रेशिओ : कंपनीचा कंम्बाइन्ड रेशो ९८.९ टक्क्यांनी सुधारला आहे. गेल्या वर्षीच्या १०२.१ च्या तुलनेत यात ३१७ बेसिक पॉईंट्सची लक्षणीय सुधारणा झाली आहे.

o   दाव्यांचे प्रमाण (लॉस रेशिओ) ३०१ बेसिस पॉईंट्सनी सुधारुन ६८.८ टक्क्यांवर आला आहे.

o   कंपनीच्या खर्चाचे प्रमाण १६ बेसिस पॉइंटनी सुधारुन ३०.१ टक्क्यांवर आले आहे. ही टक्केवारी कंपनीची उत्तम कार्यक्षमता दर्शवते.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यातील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये –

§  व्यवसाय वृद्धीकंपनीने एकूण १३ हजार ८५६ कोटी रुपयांचा प्रीमियम जमा केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील कामगिरी पाहता यात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

§  निव्वळ नफाकंपनीच्या निव्वळ नफ्यात ८७ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. या नऊ महिन्यांत कंपनीने ९६६ कोटींचा नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षी याच काळात ५१६ कोटी एवढाच नफा झाला होता.

§  कंम्बाइन्ड रेशिओकंपनीचा कंम्बाइंड रेशिओ सुधारुन ९९.८ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या १०२.१ टक्क्यांच्या तुलनेत यात २२२ बेसिस पॉईंट्सची लक्षणीय सुधारणा झाली असूनहे कंपनीच्या फायदेशीर कामकाजाचे द्योतक आहे.

o   दाव्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १२४ बेसिस पॉइंट्सची सुधारणा झाली आहे.

o   कंपनीच्या एकूण खर्चाचे प्रमाण ९९ बेसिस पॉईंट्सनी सुधारत २१.८ टक्क्यांनी झाले आहे. यातून कंपनीची कार्यक्षमता वाढल्याचे स्पष्ट होते.

दाव्यांची पूर्तता आणि ग्राहकांचा विश्वास

§  आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत स्टार हेल्थने १३.६ लाख दाव्यांची यशस्वीरित्या पूर्तता केली आहे. यासाठी कंपनीने ८ हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे दावे मंजूर करुन ग्राहकांना मोठा आधार दिला आहे.

§  कंपनीच्या सेवांवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास असल्याचे यावरुन दिसून येते की, पॉलिसी नूतनीकरणाचे प्रमाण ९९.२ टक्के इतके मजबूत राहिले आहे.  

§  कंपनीच्या एकूण सेवांबद्दलचा ग्राहकांचा समाधान निर्देशांक डिसेंबर २०२४ मधील ५५ वरुन सुधारुन डिसेंबर २०२५ मध्ये ६४ वर पोहोचला आहे.

§  विमा दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेतील समाधान निर्देशांकदेखील डिसेंबर २०२४ मधील ६३ च्या तुलनेत सुधारुन ६४ इतका झाला आहे.

डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर

स्टार हेल्थने आपल्या कार्यप्रणालीत डिजिटल तंत्रज्ञान अंमलात आणले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांसोबतच्या नाते चांगल्यारितीने विकसित झाले आहे. या आर्थिक वर्षात नवीन रिटेल विक्रीमध्ये डिजीटल माध्यमाचा वाटा २० टक्क्यांवर दिसून आला. सर्व माध्यमातून जमा होणा-या एकूण प्रीमियमपैकी ७६ टक्के वाटा डिजीटल स्वरुपात गोळा झाला आहे. कंपनीच्या अटम या वितरण एप्लिकेशनद्वारे तिस-या तिमाहित ८५ टक्के नवीन पॉलिसींची विक्री झाली. ही विक्री तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या बळाने वाढल्याचे निदर्शनास आले. दाव्यांच्या व्यवस्थापनासाठी कंपनीच्या एआय आधारित इंजिनचा वापर ५७ टक्क्यांपर्यत वाढला असून, यामुळे कामाचा वेग आणि ग्राहकांचे समाधान दोन्ही उंचावले आहे. डिसेंबर २०२५पर्यंत कंपनीच्या ग्राहक एप्लिकेशनचे १ कोटी ३० लाखांहून अधिक डाऊनलोड झाल्याची नोंद आहे. या अपद्वारे ६० हजारांहून अधिक दावे सादर करण्यात आले असून, ३ लाखांहून अधिक पॉलिसींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या आकडेवारीवरुन ग्राहकांचा डिजीटल सेवांवरील विश्वास वाढत असल्याचे दिसून येते.

विमा दाव्यांच्या व्यवस्थापमामध्ये स्टार हेल्थने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला असून, आता ५७ टक्के दावे या आधुनिक प्रणालीद्वारे हाताळले जात आहेत. यामुळे कामकाजाची उत्पादकता वाढली असून, ग्राहकांकडूनही अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचे ग्राहक एप्लिकेशनदेखील वेगाने लोकप्रिया होऊ लागले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या एलिकेशनच्या डाऊनलोड्सची संख्या १ कोटी ३० लाखांपर्यंत गेली आहे. दरमहा १५ लाखांहून अधिक युजर्स याचा सक्रिय वापर करत आहेत. ग्राहकांचा सेल्फ सर्व्हिस या संकल्पनेवर आता दृढ विश्वास बसल्याने या एप्लिकेशनवर ३ लाखांहून अधिक दावे सादर करण्यात आले आहेत. या दाव्यांची संख्या गेल्या नऊ महिन्याच्या तुलनेत दुप्पट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. ३ लाखांहून अधिक ग्राहकांनी या एप्लिकेशनच्या माध्यमातून पॉलिसींचे नूतनीकरण केले आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद हे कंपनीच्या डिजीटल क्रांतीचे यश आहे.  . 

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांची भूमिका –

यावर स्टार हेल्थ एण्ड अलाइड इन्शुअरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद रॉय यांनी आपली भूमिका मांडली. त्यांची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे –

“स्टार हेल्थने रिटेल आरोग्यविमा क्षेत्रात आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि भविष्यात अधिक मूल्य निर्माण करणा-या शाश्वत व्यवसायाची उभारणी करण्यावर कंपनीचा भर आहे. केवळ व्यवसाय वाढवणेच नव्हे तर भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल अशा रिटर्न ऑन इक्विटी आधारित परिणामांना प्राधान्य दिले जात आहे. कंपनी एक मजबूत आणि विश्वासार्ह विमा संस्था म्हणून आपली वाटचाल करण्यात कटिबद्ध आहे. 

पोर्टफोलिओची पुनर्रचना, विम्याच्या अटींचे शिस्तबद्ध पालन, खर्चाचे चोख नियोजन आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा यांमुळे कंपनीची कार्यक्षमता अधिक मजबूत झाली आहे. याचे प्रतिबिंब दाव्यांचे सुधारते प्रमाण, खर्चाच्या प्रमाणात झालेली घट आणि ग्राहकांना मिळणारा उत्तम अनुभव यांतून स्पष्टपणे दिसून येत आहे. या मुख्य घटकांसोबतच कंपनीने गुंतवणूकीवर ९.६ टक्के इतरा समाधानकारक परतावा मिळवला असून, हे कंपनीच्या मूल्यवर्धनासाठीच्या सक्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणाचे प्रतीक आहे.

आम्ही आमची आर्थिक अहवाल पद्धत आता आयएफआरएस या जागतिक मानांकनानुसार तयार करत आहोत. यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल. जागतिक स्तारावरील इतर कंपन्यांशी आमची तुलना करणे अधिक सोपे होईल. २०२७ पासून संपूर्ण विमा क्षेत्रासाठी हे जागतिक नियम लागू होणार आहेत. आम्ही या बदलासाठी आत्तापासूनच पूर्णपणे सज्ज झालो आहोत. या बदलामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल.

सध्या देशात आर्थिक घडामोडींतील पोषक वावर तसेच सरकारी धोरणे पाहता या सर्व बाबी आमच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक आहेत. भारतातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी म्हणून, २०४७ पर्यंत विमा सर्वांसाठी हे राष्ट्रीय उद्दिष्ट आम्ही ध्यानात ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला विम्याचे संरक्षण मिळवून देऊन, त्यांच्या भविष्याला सुरक्षितात प्रदान करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत : पुष्कराज पाठक

पुणे : कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनव कला महाविद्यालयाचे माजी...

उद्या दुपारी निश्चित होतील पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ..

पुणे- महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक एवढे बळ असल्याने हा...

महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त,आता अनिरुद्ध पावसकर नवे नगर अभियंता ..

पुणे : पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत...