उद्या दुपारी निश्चित होतील पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ..

Date:

पुणे- महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक एवढे बळ असल्याने हा पक्ष ठरवेल तोच महापौर ,उपमहापौर होईल आणि स्थायी समिती अध्यक्ष देखील होईल हे स्पष्ट झालेले आहे. या पैकी महापौर आणि उपमहापौर पदाची नावे उद्या ११ ते २ यावेळेत निश्चित होतील . आणि या नावांची घोषणा महापालिकेतील गटनेते अर्थात सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत होईल असे चित्र आहे. उद्याच स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नावे देखील जाहीर होतील . महापालिका निवडणूक झाली, पक्षांचे गटनेते निवडले गेले तरी अद्याप महापालिकेच्या लोक नियुक्त कारभाराला प्रारंभ झालेला नाही तो उद्यापासून होईल असे दिसते आहे.

नगरसचिव योगिता भोसले यांनी या महत्वाच्या पदांवरील निवडीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे बाबत काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट होईल नेमके काय काय आहे उद्या ते … पहा काय म्हटले आहे परिपत्रकात …

विषय :- मा. महापौर व मा. उपमहापौर या पदांच्या निवडणूका व स्थायी समिती व विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अनुसार मा महापौर, मा उपमहापौर या पदांच्या निवडणूका घेणेबाबत महाराष्ट्र शासनाने केलेले मुं. प्रां. मनपा (महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणुका घेणे) नियम २००५ व सुधारित नियम २००६ व २०१० मधील दुरुस्त नियम क्र. ३(२) अन्वये पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीनंतरची पहिली सभा (विशेष बैठक) सोमवार, दिनांक ९/२/२०२६ रोजी सकाळी ११.०० (अकरा) वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात (पुणे महानगरपालिकेच्या नविन विस्तारीतः इमारतीतील सभागृहात) मा. विभागीय आयुक्त यांचे आदेशानुसार मा. श्री. जितेंद्र हुडी, जिल्हाधिकारी, पुणे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेची कार्यपत्रिका स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९ (१) अन्वये मा. महापौर व मा. उपमहापौर या पदांची निवडणूक या सभेत होईल
महाराष्ट्र महानगरपालिका (महापौर पदाचे आरक्षण) नियम २००६, अन्वये पुणे महानगरपालिकेचे महापौर पद -महिला या प्रवर्गासाठी राखीच आहे.
महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम १९४९ चे कलम २० अन्चये स्थायी समितीबर व कलम ३० (१) अन्वये सहा विशेष समित्यांवर पालिका सदस्यांचे नामनिर्देशन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३१अ अन्वये महानगरपालिका मान्यताप्राप्त पक्षांचे अथवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेईल आणि सभागृहनेता, विरोधी पक्षनेता व अशा प्रत्येक पक्षाचा किंवा गटाचा नेता यांच्याशी विचारविनियम करुन शक्यतोवर महानगरपालिकेतील अशा पकरांच्या किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करता येईल
मा. महापौर व मा उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे.
पदाचे नाव-मा. महापौर व मा. उपमहापौर

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा वार व दिनांक-मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६

वेळ-सकाळी ११.०० ते दुपारी २.००

नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे ठिकाण-नगरसचिव,नगरसचिव कार्यालय

नामनिर्देशन पत्राचे छापील फॉर्म नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळतील,
टीप:-
१) स्थायी समितीवर एकूण १६ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत.
२) प्रत्येक विशेष समितीवर एकूण १३ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत.
३) महिला व बाल कल्याण समितीवर एकूण १३ सदस्य नियुक्त करावयाचे असून त्यापैकी ७५% सदस्य महिला सदस्या नियुक्त करावयाच्या आहेत.
४) विशेष समित्यांच्या कामकाज नियमावली नियम क्र. ६८ अन्वये एका सभासदास दोन पेक्षा अधिक समित्यांवर नियुक्त करता येणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त,आता अनिरुद्ध पावसकर नवे नगर अभियंता ..

पुणे : पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत...

एनडीएमध्ये येण्यासाठी सोबत यायचे असेल त्यांनी स्पष्ट करावी: तटकरेंचा थेट पवारांना सल्ला

सातारा :आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा दि.२- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड...