महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त,आता अनिरुद्ध पावसकर नवे नगर अभियंता ..

Date:

पुणे : पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत आली असे , नगर अभियंता पदावर तब्बल तेवीस वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेले प्रशांत वाघमारे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. एकूण ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी शहर अभियंता म्हणून कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या सेवामुक्तीनिमित्त महापालिकेतील शेकडो अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दीर्घकाळ एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांनी वाघमारे यांना निरोप देताना त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला. प्रत्यक्षात ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले , शनिवारी सुट्टी असल्याने शुक्रवारीच त्यांनी महापालिकेतील कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या जागी पथ विभागप्रमुख म्हणून काम केलेले अनिरुद्ध पावसकर यांची नगर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशांत वाघमारे यांनी १९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सेवेला सुरुवात केली. १९९३ मध्ये पुणे महापालिकेत उपअभियंता पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी पथ विभाग आणि भवन रचना विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. कालांतराने शहर अभियंता पदावर त्यांची नियुक्ती झाली आणि त्या भूमिकेत त्यांनी शहराच्या पायाभूत विकासाला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले.
वाघमारे यांच्या कार्यकाळात पुणे शहरात उभ्या राहिलेल्या अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक इमारती आणि सांस्कृतिक केंद्रे त्यांच्या कामाची साक्ष देतात. कोरेगाव पार्कमधील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडियमचे नूतनीकरण, कमला नेहरू रुग्णालयाची विस्तारित इमारत, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, चिखलवाडी येथील हॉकी स्टेडियम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, महापौर बंगला आणि महापालिका भवनाची नवी इमारत हे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली साकारले गेले. सध्या सुरू असलेली भिडे वाडा पुनर्विकास योजना आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारणीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे गेली.

सीवायजीच्या निमित्ताने शहरातील काँक्रीट रस्ते, बाणेर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण, बालेवाडी उड्डाणपुलाचे विक्रमी ६० दिवसांत पूर्ण झालेले काम, तसेच वारजे, वडगाव आणि होळकर पूल येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रे, मुंढवा जॅकवेल आणि भामा आसखेड धरणातून २०० एमएलडी पाणीपुरवठ्याचा प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, नदीकाठ सुधार प्रकल्प आणि जायका अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प या सर्व कामांमध्ये त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.
कोरोनाच्या काळात बाणेर येथे अवघ्या २१ दिवसांत तीनशे खाटांची दोन रुग्णालये उभारण्याचे आव्हानात्मक काम वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. महापालिकेचे उत्पन्न स्रोत ठप्प असतानाही सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांटसह ही रुग्णालये उभारण्यात आल्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले. त्याच काळात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या विद्युत दाहिन्यांची संख्या वाढविण्याचाही निर्णय वेगाने राबविण्यात आला.

प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून बांधकाम परवानग्यांसह विविध विभागांची कामे ऑनलाइन केल्यामुळे महापालिकेच्या कारभारात गती आणि पारदर्शकता आली. ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात पुणे महापालिकेला देशपातळीवर अग्रस्थानी नेण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा राहिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्या दुपारी निश्चित होतील पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ..

पुणे- महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक एवढे बळ असल्याने हा...

एनडीएमध्ये येण्यासाठी सोबत यायचे असेल त्यांनी स्पष्ट करावी: तटकरेंचा थेट पवारांना सल्ला

सातारा :आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा दि.२- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड...