मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला आहे. शनिवारी मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर अज्ञात व्यक्तींविरोधात BNS आणि आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांचकडून 12 विशेष पथकं तयार करण्यात आली असून, त्यांच्या अटकेसाठी तपास अधिक वेगाने सुरू झाला आणि काही वेळेपूर्वीच पुण्यातल्या ५ जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतल्याचे समजले आहे. अमान आनंद मारोटे वय 27 माळआळी कर्वेनगर, आदित्य ज्ञानेश्वर गायकी वय 19 , गल्ली न 2 कर्वेनगर पुणे. सिद्धार्थ दीपक येनपुरे वय 20 त्रिमूर्ती हॉस्पिटल शेजारी फ्लॅट न 7 आम्रपाली बिल्डिंग धायरी पुणे,समर्थ शिवशरण पोमाजी वय 18 रायकर मळा गुलमोहर सोसायटी धायरी आणि स्वप्नील बंडू सकट वय 23 ,रा. धायरी पुणे अशी याप्रकरणी पकडलेल्या तरुणांची नावे आहेत Shubham lonker Aarzo Bishnoi या नावाने सोशल माध्यामातून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आल्याचे वृत्त आहे
मुंबईतील जुहू परिसरात आज (1फेब्रुवारी) बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी पाच राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा शोध पोलीस घ्यायला सुरुवात केली . या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साक्षीदारांची चौकशीही सुरू आहे. पोलीस अधिक तपशील गोळा करत असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

