वितरणात 21% आणि निव्वळ नफ्यात (PAT) 22% वाढ नोंदवली; डिसेंबर 2025 ला संपलेल्या
चेन्नई, 30 जानेवारी 2026 : टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एनबीएफसींपैकी एक कंपनी असून, कंपनीने आज 31 डिसेंबर 2025 ला संपलेल्या तिमाही आणि 9 महिन्यांसाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने वित्त वर्ष 26 च्या 9 महिन्यांमध्ये वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत वितरणामध्ये 21% वाढ नोंदवली. टीव्हीएस क्रेडिटने वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी एकूण उत्पन्न 5,351 कोटी रुपये नोंदवले, जे वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 8% वाढलेले आहे. तसेच वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करानंतर निव्वळ नफा (PAT) Rs 658 Crore नोंदवला, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 22% वाढला आहे.
तिसऱ्या तिमाहीतील ठळक बाबी:
● एयूएम डिसेंबर ’25 अखेर Rs 29,678 कोटींवर पोहोचले, जे डिसेंबर ’24 च्या तुलनेत 9% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण उत्पन्न 1,870 कोटी रुपये होते, जे वित्त वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 9% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी करपूर्व नफा 370 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 15% वाढला आहे.
● वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी करानंतर निव्वळ नफा Rs 272 Crore होता, जो वित्त वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 13% वाढला आह
वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांतील ठळक बाबी:
● एयूएम डिसेंबर ’25 अखेर 29,678 कोटी रुपयांवर पोहोचले, जे डिसेंबर ’24 च्या तुलनेत 9% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी एकूण उत्पन्न 5,351 कोटी रुपये होते, जे वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 8% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करपूर्व नफा 890 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 23% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करानंतर निव्वळ नफा 658 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 22% वाढला आहे.
वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ने वितरणामध्ये सातत्याने वाढ नोंदवली. जीएसटी 2.0 अंमलबजावणीनंतर सकारात्मक ग्राहक भावना आणि कमी महागाईमुळे विविध उत्पादन श्रेणींमध्ये मागणी वाढली. यामुळे विक्री वाढ, बाजारपेठेत अधिक खोलवर प्रवेश आणि मार्केट शेअरमध्ये वाढ झाली.
टीव्हीएस क्रेडिटला सणासुदीच्या हंगामातही मजबूत मागणीचा फायदा झाला. या कालावधीत कंपनीने विविध उत्पादन श्रेणींमध्ये जोखीम-संतुलित वाढीवर लक्ष केंद्रित ठेवत विविधीकृत कर्ज पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर दिला. तसेच विद्यमान उत्पादनांची बाजारपेठेतील पोहोच वाढवणे, नवीन उत्पादन ऑफर वाढवणे, वितरण नेटवर्कचा विस्तार करणे आणि ग्राहक अनुभव तसेच ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यावर कंपनीने भर कायम ठेवला.
वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांदरम्यान टीव्हीएस क्रेडिटने 41 लाखांपेक्षा अधिक नवीन ग्राहकांना कर्ज वितरित केले, ज्यामुळे कंपनीचा एकूण ग्राहक आधार जवळपास 2.3 कोटी झाला.
पुढेही टीव्हीएस क्रेडिट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करत ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून मजबूत जोखीम व्यवस्थापन पद्धती कायम ठेवणार आहे.

