- दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांच्या बलिदानाला अभिवादन
पुणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात गुरुवारी (दि.30) आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून मौन पाळून शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, जमीन व मालमत्ता विभागाचे उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह पीएमआरडीएचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्य आणि एकात्मतेसाठी शहिदांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला उपस्थितांनी नमन केले. राष्ट्रप्रेम, त्याग आणि समर्पणाची मूल्ये जपण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. शहिदांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

