संपूर्ण उद्योगाच्या १.७ पट अधिक वेगवान वाढीची नोंद
मुंबई; ३० जानेवारी, २०२६: भारतातील अग्रगण्य जनरल विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एसबीआय जनरल विमा इन्शुअरस्नने आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये पहिल्या नऊ महिन्यांत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या प्रभावी कामगिरीमुळे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारी जनरल इन्शुअरन्स कंपनी म्हणून एसबीआय जनरलचे नाव घेतले जात आहे. ग्राहकाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण वाढीच्या जोरावर कंपनीने विमा क्षेत्रात आपली प्रगती कायम राखली असून, हा विकास त्यांच्या कार्यक्षमतेची भक्कम साक्ष देत आहे.
आपल्या प्रगतीची घौडदौड कायम राखत, कंपनीने १० हजार ६७० कोटी रुपयांचा ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम नोंदवला असून, यामध्ये १४.५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ही वाढ विमा क्षेत्राच्या सरासरी ८.७ टक्के वृद्धीदरापेक्षा अधिक आहे. कंपनीने पीक विमा वगळता इतर व्यवसायांमध्ये २५.५ टक्के इतकी प्रचंड वाढ साध्य केली आहे. याच काळात संपूर्ण विमा क्षेत्रातील वाढ ही १३.१ टक्के इतकी मर्यादित होती. या आकडेवारीवरुन कंपनीचे विमा बाजारातील वर्चस्व वाढत असून, सर्वच क्षेत्रांतील तिची दमदार कामगिरी स्पष्टपणे दिसून येत आहे.
कंपनीच्या विविध व्यवसाय विभागातील सातत्यपूर्ण वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये कंपनीला उत्कृष्ट कामगिरी साधता आली. या कालावधीत आरोग्य विमा विभागात २९ टक्के, वैयक्तिक विमा विभागात ४९ टक्के, मोटार विमा विभागात १९ टक्के आणि फायर विमा विभागात १३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. विविध विभागातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कंपनीचा व्यवसाय विस्तार, कार्यक्षमता, ग्राहकाभिमुख उपक्रमांवर असलेला भर अधिक स्पष्ट झाला आहे. खासगी आणि स्टँडलोन हेल्थ इन्शुअरन्स कंपन्यांच्या बाजारपेठेत कंपनीने आपला हिस्सा ३९ बेसिस पॉईंट्सनी वाढवला असून, तो गेल्या वर्षाच्या ६.२५ टक्क्यांवरुन आता ६.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
या काळात कंपनीने ५२२ कोटी रुपयांचा करारानंतरचा निव्वळ नफा कमावला आहे. निव्वळ नफ्याची नोंद पाहता कंपनीची आर्थिक कामगिरी अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते. याच कालावधीत दाव्यांचे प्रमाण दर्शवणारा ‘लॉस रेशिओ’ गेल्या वर्षीच्या ८४.३ टक्क्यांवरुन लक्षणीयरित्या सुधारुन ७८.५ टक्क्यांवर आला आहे तर सॉल्व्हन्सी रेशिओ २.१२ पट राहिला आहे. सॉल्वेन्सी रेशिओचे प्रमाण हे नियामक संस्थांनी निश्चित केलेल्या किमान १.५०च्या मर्यादेपेक्षा ब-याच जास्त आहे. हे सर्व आकडे कंपनीची भक्कम आर्थिक स्थिती, जोखीम व्यवस्थापनातील शिस्त आणि दीर्घकालीन स्थैर्य अधोरेखित करतात.
कंपनीच्या कामगिरीवर एसबीआय जनरल इन्शुअरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवीन चंद्र झा यांनीही आपले मत नोंदवले. ते म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२६च्या पहिल्या नऊ महिन्यांतील आमची कामगिरी ही भविष्यासठी आम्ही रचत असलेल्या भक्कम पायाभरणीचे प्रतिबिंब आहे. या कालावधीत कंपनीने संपूर्ण उद्योगाच्या तुलनेत १.७ पट आणि खासगी आणि एसएएचआय कंपन्यांच्या तुलनेत १.९ पट अधिक वेगाने प्रगती केली असून, कंपनीने १० हजार ७६९ कोटी रुपयांचा जीडीपी नोंदवला आहे. ही वाढ केवळ व्यवसायाचा विस्तार करण्यापुरती मर्यादित नसून, एक तंत्रज्ञान आधारित आणि ग्राहकाभिमुख विमा संस्था उभारण्यावर आमचा भर आहे. ग्राहकांचा विश्वास दृढ करणे, बदलत्या जोखीमपूर्ण वातावरणात भारतातील प्रत्येक कोप-यापर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवून शाश्वत मूल्य निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’’
एसबीआय जनरल इन्शुअरन्सचे मुख्य आर्थिक अधिकारी श्री. जितेंद्र अत्रा म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२६मधील पहिल्या नऊ महिन्यातील कामगिरी ही कंपनीची जोखमी व्यवस्थापन प्रणाली, शिस्तबद्ध कामकाज, दीर्घकालीन आर्थिक रणनीती यांच्या यशामुळे साधता आली. कंपनीच्या लॉस रेशिओमध्ये मोठी सुधारणा झाली असून, तो गेल्या आर्थिक वर्षातील ८४.३ टक्क्यांवरुन ७८.५टक्क्यांवर आला आहे. हे यश उत्तम अंडररायटिंग, अचूक जोखीम निवड, प्रभावी दावा व्यवस्थापन आणि वाढलेली कार्यक्षमता यामुळेच शक्य झाले आहे. बदलत्या बाजारपेठेत सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण कऱणे, भांडवलाची कार्यक्षमता वाढवणे आणि शाश्वत नफ्यासह आर्थिकदृष्ट्या भक्कम संस्था उभारण्यावर आमचा कायमस्वरुपी भर राहील.’’
एसबीआय जनरल इन्शुअरन्सने तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उत्पादने आणि ग्राहकांच्या उत्कृष्ट अनुभवावर सातत्याने भर देत आपली प्रगतीची गती अधिक मजबूत केली आहे. शिस्तबद्ध कार्यप्रणाली, समतोल व्यावसायिक पोर्टफोलिओच्या जोरावर भविष्यातील नफ्यासाठी स्थिर पाया तयार केला आहे. कंपनीने प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे बाजारपेठेतील स्थान भक्कम केले आहे. एसबीआय जनरल इन्शुअरन्स कंपनी आता दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी सज्ज आहे. कंपनी विकासाच्या सर्व धोरणात्मक बाबींच्या आधारावर आपले स्थान अधिक भक्कम करत आहे.

