पुणे : महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठीची निवडणूक आता ६ ऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर स्थायीसह अन्य विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्तीही त्याच दिवशी केली जाणार आहे.
महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही पदांसाठीची निवडणूक होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवरच स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती, इतर विषय समित्यांवर १३ सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषयदेखील घेण्यात आला आहे.

