हिंदूस्तान कॉपरच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला. गेल्या चार दिवसांत या शेअरने तब्बल 40% ची झेप घेतली आहे. इतकेच नाही, तर गेल्या 30 दिवसांत यात सुमारे 55.92 % ची वाढ झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास, हा शेअर 194% पेक्षा जास्त वाढला आहे.
दोन प्रमुख कारणं समोर
जगभरात तांब्याच्या किमती सध्या खूप तेजीत आहेत. गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) जानेवारी महिन्यातील डिलिव्हरीसाठी असलेल्या तांब्याच्या किमतीत 5% पेक्षा जास्त वाढ झाली. या वाढीमुळे तांब्याची किंमत प्रति किलो 1350 रुपयांच्या पुढे गेली. भू-राजकीय तणाव, व्यापारातील अनिश्चितता आणि डॉलरच्या घसरलेल्या किमती यामुळे तांब्याची मागणी वाढली आहे.तसेच हिंदुस्तान कॉपरला मिळालेला एक नवीन तांब्याचा ब्लॉक, या दोन प्रमुख कारणांमुळे शेअरमध्ये एवढी मोठी तेजी दिसून येत आहे.
कंपनी, शेअर बाजारातील कामगिरी
गुरुवारी, एनएसईवर हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स 20% नी वाढून 760 रुपयांवर पोहोचले. या शेअरमधील ही तेजी गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाली होती. 22 जानेवारी रोजी हे शेअर्स 543.30 रुपयांवर बंद झाले होते आणि त्यानंतर तेजी अविरतपणे सुरूच आहे. मंगळवारी 5% आणि बुधवारी 12.5% ची वाढ झाली, ज्यामुळे धातूंच्या बाजारात एकच खळबळ उडाली. नवीन तांब्याच्या ब्लॉकमुळे वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कंपनीशी संबंधित बातम्यांनीही या तेजीला आणखी बळ दिले आहे. गेल्या आठवड्यात हिंदुस्तान कॉपरने जाहीर केले की, ते मध्य प्रदेशात एका नवीन तांब्याच्या ब्लॉकसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. यामुळे भविष्यात उत्पादन वाढण्याची अपेक्षा अधिक मजबूत झाली आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा जगभरात तांब्याची मागणी वाढत आहे.
इंडसइंड सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की, तांबे त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तांब्याच्या फ्युचर्समध्ये 5% ची वाढ झाली असून ते 6.2 डॉलर प्रति पाउंडच्या वर गेले आहे. हा विक्रम मोडला गेला कारण गुंतवणूकदार रिअल इस्टेट (जसे की सोने, चांदी, तांबे) सारख्या मालमत्तांकडे वळत आहेत. भू-राजकीय आणि व्यापारी अनिश्चितता तसेच डॉलरमध्ये अचानक आलेली घसरण यामुळे गुंतवणूकदार थोडे घाबरले आहेत. या कारणांमुळेही तेजी येत आहे.
जिगर त्रिवेदी पुढे म्हणाले की, तांब्याच्या मूलभूत घटकांमध्येही मजबुती आहे. तांब्याला सतत पुरवठ्याची कमतरता आणि औद्योगिक क्षेत्राकडून असलेली मजबूत मागणी यांचा आधार मिळत आहे. विशेषतः, जगभरात रिन्यूएबल एनर्जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता वापर यामुळे तांब्याची मागणी वाढली आहे.

