बारामती, दि.२९ : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले. यावेळी त्या अत्यंत भावुक झाल्या असून, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
डॉ. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
“वेळेवर येणारे दादा वेळेआधीच गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये त्यांचे उत्तम जमले होते. असे अर्ध्यावर डाव सोडून गेल्याने खूप वाईट वाटत आहे,” अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

