अशोक लेलँडतर्फे वैशिष्ट्यपूर्ण TAURUS आणि HIPPO हे हेवी-ड्युटी ट्रक्स पुन्हा सादर

Date:

पुणे -: हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि देशातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या अशोक लेलँडने आज TAURUS आणि HIPPO हे आपले दोन अत्यंत महत्वपूर्ण ट्रक्स पुन्हा सादर केले. आधुनिक युगासाठी पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या या मॉडेल्समध्ये TAURUS हा उच्च हॉर्सपॉवर टिपर रेंजचे प्रतिनिधित्व करतो, तर HIPPO ट्रॅक्टर पोर्टफोलिओचा कणा आहे. त्यांच्या पुनर्सादरीकरणामुळे मजबुती आणि विश्वासार्हतेचे प्रतीक ठरलेली ही नावे पुन्हा एकदा बाजारपेठेत परतली असून, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्याने डिझाइन करण्यात आले आहे.

या वाहनांचे अनावरण अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी MHCV अध्यक्ष श्री. संजीव कुमार आणि नॅशनल सेल्स हेड श्रीमती माधवी देशमुख यांच्यासह मान्यवर ग्राहक, डीलर्स आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

उच्च उत्पादकता, सुधारित अपटाइम, उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि चालकांना  आराम मिळण्याच्या दृष्टीने सुधारित सेवा यांसह नवीन TAURUS आणि HIPPO रेंज फ्लीट ऑपरेटर्सना अधिक चांगले लाइफसायकल इकॉनॉमिक्स आणि जास्त नफाक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. अशोक लेलँडच्या प्रगत AVTR मॉड्युलर ट्रक प्लॅटफॉर्मवर आधारित या नव्या रेंजमध्ये विविध कॉन्फिगरेशन्स आणि फीचर पर्यायांमुळे अधिक लवचिकता उपलब्ध आहे. TAURUS आणि HIPPO हे दोन्ही मॉडेल्स भारतभरातील अशोक लेलँड डीलरशिप्समार्फत नोंदणी आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध असतील.

अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अग्रवाल म्हणाले, “TAURUS आणि HIPPO हे खाणकाम, पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील हेवी-ड्युटी गरजांसाठी खास तयार करण्यात आले आहेत. ही नवीन ट्रक रेंज अशोक लेलँडच्या A-Series 6-सिलेंडर इंजिन्सवर चालते. अतुलनीय टिकाऊपणा आणि विश्वासार्हता, अधिक उत्पादकता आणि जलद टर्नअराउंड टाइम्स सादर करत त्यामध्ये आता इंडस्ट्रीतील आघाडीचा पीक टॉर्क आणि पॉवर उपलब्ध आहे.”

अशोक लेलँड MHCV अध्यक्ष श्री. संजीव कुमार संजीव कुमार म्हणाले, “HIPPO आणि TAURUS ही केवळ उत्पादनांची नावे नाहीत; ती भारतीय वाहतूकदारांच्या अनेक पिढ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या दंतकथा बनली आहेत. भारतीय महामार्गांपासून ते खाण क्षेत्रांपर्यंत हेवी-ड्युटी परफॉर्मन्सचे हेच प्रतीक ठरले आहे आणि हाच वारसा आम्ही पुढे नेत आहोत. टिपर्स आणि ट्रॅक्टर्स हे MHCV उद्योगातील सर्वात वेगाने वाढणारे विभाग असून भारताच्या पायाभूत सुविधा विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कठीण भूभाग आणि अत्यंत टोकाच्या परिस्थितींमध्ये काम करणाऱ्या या वाहनांना उत्कृष्ट विश्वासार्हता, मजबुती आणि चालकांना आरामाची गरज असते. नवीन TAURUS आणि HIPPO या सर्वमान्य मजबुतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतात. कामकाजाची सुलभता, चालकाचा थकवा कमी करणे आणि यातील भागांचा टिकाऊपणा वाढवणे यामध्ये आम्ही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. अधिक टिकाऊ ड्राइव्हट्रेन आणि जलद टर्नअराउंड टाइम्स यांसारखी वैशिष्ट्ये थेट जास्त अपटाइम आणि अधिक नफ्यात रूपांतरित होतील. या सादरीकरणातून ग्राहक-केंद्रित नवकल्पना आणि कामकाज उत्कृष्टतेबाबत असलेली आमची बांधिलकी अधोरेखित होते.”

परंपरेचे पुनर्सादरीकरण

TAURUS आणि HIPPO ही नावे अनेक दशकांची सिद्ध कामगिरी आणि ग्राहकांचा विश्वास घेऊन येतात. 1980 च्या दशकापासून 2000 च्या सुरुवातीपर्यंत HIPPO च्या अत्यंत यशस्वी प्रवासामुळे ते त्या काळातील निश्चित हेवी हॉलर ठरले. हेवी-ड्युटी अ‍ॅग्रीगेट्ससह सुसज्ज असलेल्या या वाहनाने विश्वासार्हता, मजबुती, पॉवर आणि अतुलनीय टिकाऊपणासाठीची अढळ प्रतिमा निर्माण केली. फ्लीट मालकांसाठी हे नाव कधीही निराश न करणाऱ्या विश्वासू वर्कहॉर्सच्या आठवणी जागवते.

TAURUS ने भारतातील पहिला मल्टी-अ‍ॅक्सल ट्रक म्हणून आपला ठसा उमटवत हेवी-ड्युटी ऑपरेशन्ससाठी मापदंड निश्चित केले. कठीण, आव्हानात्मक परिस्थितीत सातत्याने काम करण्याची त्याची क्षमता देशभरातील उच्च लोड कामांसाठी त्याला पहिला पसंतीचा पर्याय बनवत होती. आजही भारतभरातील अनेक फ्लीट ऑपरेटर्स मल्टी-अ‍ॅक्सल टिपर्सना “TAURUS” असे म्हणतात. उद्योगक्षेत्रावर या नावाचा असलेला दीर्घकालीन प्रभाव आणि व्यावसायिक वाहन क्षेत्रावर त्याने उमटवलेली अमीट छाप याचे हे द्योतक आहे.

अत्याधुनिक कामगिरी

नवीन TAURUS आणि HIPPO रेंज हा वारसा जपत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. 8.0-लिटर A-Series 6-सिलेंडर इंजिनवर चालणाऱ्या या ट्रक्स रेंजमध्ये 360 HP पॉवर आणि 1,600 Nm इतका सर्वोत्तम-इन-क्लास टॉर्क मिळतो. मजबूत चासिज, हेवी-ड्युटी ड्राइव्हट्रेन आणि उत्कृष्ट स्थिरतेमुळे ही वाहने अत्यंत कठीण वापर उपयोजनाच्या वेळीही अतुलनीय टिकाऊपणा आणि चालकांना अधिक चांगला आराम देतात.

TAURUS मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आणि आव्हानात्मक खाण क्षेत्रासाठी डिझाइन करण्यात आला असून, सिद्धहस्त टिपर परंपरा आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचे संयोजन सातत्यपूर्ण उच्च कार्यक्षमता देते. HIPPO हे बल्क कमोडिटीज, औद्योगिक कच्चा माल आणि ODC वाहतुकीसारख्या हेवी-ड्युटी कामांसाठी तयार करण्यात आले आहे. सुधारित केबिन कम्फर्ट, अधिक टिकाऊ ड्राइव्हट्रेन आणि जलद टर्नअराउंड टाइम्समुळे TAURUS आणि HIPPO दोन्ही मॉडेल्स आधुनिक फ्लीट ऑपरेटर्सना अपेक्षित असलेली उत्कृष्ट पुलिंग पॉवर, कामकाज कार्यक्षमता आणि लाइफसायकल इकॉनॉमिक्स पुरवितात.

अनेक दशकांच्या अभियांत्रिकी कौशल्याच्या बळावर आणि देशव्यापी मजबूत नेटवर्कसह, अशोक लेलँड व्यावसायिक वाहन उद्योगातील आपले स्थान अधिक मजबूत करत नाविन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि मूल्याधारित MHCV उपायसुविधा देत आहे. TAURUS आणि HIPPO सह, अशोक लेलँडने व्यावसायिक वाहन क्षेत्रातील आपले नेतृत्व अधिक दृढ केले असून उच्च हॉर्सपॉवर MHCV विभागामध्ये नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे...

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड....

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन...