उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन

Date:

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांना बुधवार पेठेतील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले आहे. 

या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांसह कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे  आणि सेवेकरी व भाविक देखील उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, रांगोळी ही जमिनीवर साकारणारी कलाकृती आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले नेते होते. त्यामुळे रांगोळीद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच अजितदादा पवार यांच्या सोबत असताना अपघातात निधन पावलेल्या मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

मंदिरासमोर ही रंगावली साकारण्यात आली असून रविवार, दि. १ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात येणार आहे. श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या कलाकारांनी ही रंगावली साकारली आहे. तब्बल २० बाय २५ फूट आकारातील ही भव्य रंगावली पाहण्यासाठी आणि अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे...

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड....

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन...