गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपतर्फे जीवीस अवॉर्ड्स २०२६सीझन ५ चे आयोजन
अर्ज नोंदणीसाठी ३१ जानेवारी २०२६ अंतिम तारीख असेल
पुणे , २९ जानेवारी २०२६ – गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्स विभागाने भारतातील वास्तुकला आणि अंतर्गत सजावट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी जीवीस अवॉर्ड्स २०२६ची घोषणा केली आहे. यंदाचे या पुरस्काराचे ५वे पर्व आहे. या वार्षिक पुरस्कारांद्वारे देशभरातील नाविन्यपूर्ण प्रकल्प, अफाट कल्पकता आणि पर्यावरणपूरक शाश्वत डिझाइन पद्धतींचा सन्मान केला जाणार आहे. देशभरातील सर्व वास्तुविशारद आणि डिझाइर्नसाठी ही स्पर्धा खुली असून, नामांकित तज्ज्ञांच्या समितीद्वारे या प्रवेशिकांचे मूल्यमापन केले जाईल. मार्च २०२६मध्ये एका भव्य सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लबचा एक भाग असलेला हा उपक्रम, उद्योगातील व्यावसायिकांना एकत्र आणून डिझाइनवर आधारित विचारसरणीला चालना देण्यासाठी आयोजित केला जातो.
खालील तारखांनुसार कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले जाईल:
· पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत: ३१ जानेवारी २०२६
· प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची घोषणा: ७ फेब्रुवारी २०२६
· निवड समितीच्या पाहणीत थेट प्रक्षेपणातून होणारी अंतिम फेरी : १३ आणि १४ फेब्रुवारी २०२६
· विजेत्यांची घोषणा आणि पुरस्कार सोहळा: ७ मार्च २०२६
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात निवासी, व्यावसायिक, संस्थात्मक आणि आदरातिथ्य अशा विविध क्षेत्रांतील एकूण १५ श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांचे सर्वोत्तम काम प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पूर्ण झालेले प्रकल्प ग्राह्य धरले जातील.
जीवीस अवॉर्ड्स २०२५ बद्दल उत्साह व्यक्त करताना, गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्सचे बिझनेस प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, ‘’जीवीस हे नेहमीच डिझाइनमधील उत्कृष्टता तसेच घर आणि कार्यालयीन स्थळांचे डिझाइन घडवणा-या व्यक्तींचा सन्मान करणारे व्यासपीठ ठरले आहे. यंदाच्या ५व्या पर्वात आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सकडून नाविन्यपूर्ण, जबाबदार आणि माणूस-केंद्रित डिझाइन उपायांद्वारे सातत्याने नवे मापदंड सादर करण्याचे कौशल्य पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आतापर्यंत २ हजारांहून अधिक नामांकने प्राप्त झाली आहेत. यंदाच्या पर्वात सखोल आणि विचारपूर्वक नियोजन दाखवणारे तसेच डिझाइन उत्कृष्टतेचे निकष नव्याने ठरवणारे प्रकल्प अनुभवण्याची आम्हांला उत्सुकता आहे.’’
देशातील प्रसिद्ध आर्किटेक्ट्स, डिझाइन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ या पुरस्कार सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून कामकाज पाहतील. यंदाच्या पर्वातील विजेत्यांच्या निवडीसाठी आर्किटेक्ट कोलकाता येथील विवेक सिंग राठोड (सॅलियंट), अहमदाबादचे आर्किटेक्ट हार्टमुट (ब्लॉटर), मुंबईचे आर्किटेक्ट यतिन पटेल (डीएसपी डिझाइन असोसिएट्स), दिल्लीचे आर्किटेक्ट सौरश चंद्रा (डीडीएफ कन्सल्टंट्स), पुण्यातील आर्किटेक्ट राहुल साठे(सीसीबीए), दिल्लीचे आर्किटेक्ट चरणजीत सिंह शाह (क्रिएटीव्ह ग्रुप) यांसारख्या दिग्गज व्यक्ती परिक्षक म्हणून निमंत्रित केले आहेत. विविध प्रकारच्या वास्तुकलेत या तज्ज्ञांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवांसह सामूहिक संवाद आणि ज्ञानाच्या बळावर पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाईल. पुरस्कार निवडीची प्रक्रिया अत्यंत काटोकोरपणे, पारदर्शक आणि विश्वासार्हतेने पार पाडली जाईल.
या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले भारतीय वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकार यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वांनी आपली कुशलता नामांकित परीक्षकांच्यासमोर सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवीस अवॉर्ड्स हे डिझाइन क्षेत्रातील उत्कृष्टतेचे आणि मानाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. या स्पर्धेतील विजेत्यांचा मार्च २०२६मध्ये एक भव्य सोहळ्यात सन्मान केला जाईल. यासह विजेत्यांना गोदरेजचे विविध प्लॅटफॉर्म्स आणि भागीदार माध्यम समूहांच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्धी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळेल.
अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी https://www.geeveesawards.com/sign-up या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. संपर्क क्रमांक – +918657028166

